शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

अखेर साई पक्षाची घटना सादर

By admin | Updated: April 4, 2017 04:14 IST

कोकण विभागीय आयुक्तांकडे अखेर साई पक्षाने पक्षाची घटना सादर केली

उल्हासनगर: कोकण विभागीय आयुक्तांकडे अखेर साई पक्षाने पक्षाची घटना सादर केली, तर शिवसेनेने उच्च न्यायालयात कॅव्हिएट दाखल केले. शिवसेनेच्या तक्रारीवरून कोकण विभागीय आयुक्तांनी घटना सादर न केल्याचे कारण देऊन साई पक्षाच्या गटाची नोंदणी शनिवारी रद्द केली होती. उल्हासनगर महापौरपदाची निवडणूक बुधवार, ५ एप्रिल रोजी आहे. महापौरपदावरून भाजपा व शिवसेनेत रस्सीखेच सुरू असून घोडेबाजाराला ऊत आला आहे. एकेका मताकरिता २५ लाख रुपये मोजण्याची तयारी दाखवली जात आहे. साई पक्षाने गट नोंदणीच्यावेळी पक्षाची घटना सादर केली नाही, असा आक्षेप शिवसेनेने घेऊन त्यांच्या गटाची नोंदणी रद्द करण्याची मागणी कोकण विभागीय आयुक्ताकडे केली होती. विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी शिवसेनेचा आक्षेप ग्राह्य धरत साई पक्षाची गटनोंदणी रद्द केली. त्यामुळे पक्षाच्या नगरसेवकांवर व्हिप बंधनकारक होत नाही. तसेच त्या पक्षाचे स्वीकृत नगरसेवकपद धोक्यात आले. याप्रकाराने भाजपा गोटात खळबळ उडाली. आपल्यावरील कारवाईविरुद्ध साई पक्ष न्यायालयात जाईल, अशी शंका शिवसेनेला असल्याने शिवसेना शहरप्रमुखांनी उच्च न्यायालयात कॅव्हिएट दाखल केले आहे. सोमवारी साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे जाऊन पक्षाची घटना सादर केली. आता विभागीय आयुक्त पक्षाच्या गटाला महापौर निवडणुकीपूर्वी मान्यता देणार असल्याची माहिती इदनानी यांनी दिली. त्याचबरोबर पक्षाच्या स्वीकृत नगरसेवकपदावरही गंडांतर येणार नसल्याचे ते म्हणाले. आता विभागीय आयुक्त कोणती भूमिका घेतात, याकडे शिवसेनेचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)५ एप्रिल रोजी महापौर निवडणुकीच्या वेळी पंचम कलानी यांच्यासह २१ नगरसेवक सामूहिक राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळेच सध्या चव्हाण कलानी यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ओमी टीमला स्थायी समिती सभापतीपदासह सव्वा वर्षाने महापौरपदाचे आश्वासन दिल्याचे समजते. कलानी व मनोज लासी यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्याचे टाळल्याने नाराजी कायम असल्याचे बोलले जात आहे.कलानी समर्थकांत असंतोषओमी टीमची नाराजी दूर करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची दमछाक झाली आहे. ओमी टीममुळे भाजपाचे ३३ नगरसेवक निवडून आले. मात्र, तरीही भाजपाने महापौरपदाचा दिलेला शब्द न पाळल्याने कलानी समर्थकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.