शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

... अखेर जिल्हा विभाजनाचे भिजत पडलेले घोंगडे मार्गी

By admin | Updated: June 12, 2014 23:52 IST

गेली अनेक वर्षे आपल्या विकासासाठी जिल्हा विभाजन व्हावे यासाठी अडून बसलेली वसई- विरार आणि आदिवासी भागातील जनता जिल्हा विभाजनाच्या होऊ घातलेल्या निर्णयाने सुखावली आहे.

वसई : गेली अनेक वर्षे आपल्या विकासासाठी जिल्हा विभाजन व्हावे यासाठी अडून बसलेली वसई- विरार आणि आदिवासी भागातील जनता जिल्हा विभाजनाच्या होऊ घातलेल्या निर्णयाने सुखावली आहे. तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शासनाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या ठाणे जिल्ह्याचे प्रचंड क्षेत्रफळ तसेच प्रशासकीय कामकाजामध्ये निर्माण होणाऱ्या अडचणी, नागरी सुविधांचा अभाव, कुपोषित बालकांचा प्रश्न इ. बाबी लक्षात घेऊन सर्वच राजकीय पक्षांनी जिल्हा विभाजनाची मागणी केली होती. विविध प्रश्नांनी येथील आदिवासी भाग होरपळत असून येथलाच जिल्हा व्हावा अशी मागणी सर्वसामान्यांतून पुढे येत होती, परंतु नानाविध कारणावरून हे विभाजन सतत रखडत गेले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रश्नी लक्ष घालून एकसदस्य समिती नेमली. या समितीने जिल्ह्याचा दौरा करून आपला अहवाल शासनाकडे सादर केला होता. परंतु त्यानंतरही या अहवालावर निर्णय घेण्यासंदर्भात राज्य शासनाकडून चालढकल होत राहिली. लोकमतने या प्रश्नावर पुढाकार घेवून लेखमाला चालविली. विभाजनाची किती गरज आहे हे या लेखमालेने दाखवून दिले. लोकमतच्या या लेखमालेचे सर्वत्र स्वागत झाले.आघाडी सरकारमधील एका घटक पक्षाच्या नेत्याने विभाजनाऐवजी त्रिभाजनाची मागणी रेटली. त्यामुळे विभाजनाचा प्रश्न एक सदस्य समितीचा अहवाल आल्यानंतरही रखडला. त्यांच्या म्हणण्यानुसार सागरी, डोंगरी व शहरी असे तीन जिल्हे व्हायला हवेत. परंतु शासनाकडून त्यास प्रतिसाद मिळाला नाही. या मागणीमागे केवळ विभाजन लांबणीवर टाकण्याचे प्रयत्न होते. नव्याने निर्माण होणाऱ्या पालघर जिल्ह्याचे मुख्यालय पालघर येथेच होण्याची शक्यता आहे. मनोर येथे असलेली सरकारी कार्यालये व निवासस्थाने मुख्यालयासाठी उपयुक्त ठरतील तसेच मनोर हे मध्यवर्ती असून नव्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी ते जिल्हावासियांसाठी सोयीचे ठरेल. सध्या ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या १ कोटीच्या घरात गेली आहे. या अफाट क्षेत्रफळ असलेल्या जिल्ह्याचे विभाजनही काळाची गरज होती. जिल्हावासियांनी लोकमतने केलेला पाठपुरावा व शासनाने घेतलेल्या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे. (प्रतिनिधी)