शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर एकनाथ खडसे झोटिंग समितीसमोर हजर

By admin | Updated: February 14, 2017 18:11 IST

भोसरी येथील जमीन गैरव्यवहाराची चौकशी करणाऱ्या न्या. झोटींग समितीसमोर अखेर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी स्वत: उपस्थित राहून

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 14  - भोसरी येथील जमीन गैरव्यवहाराची चौकशी करणाऱ्या न्या. झोटींग समितीसमोर अखेर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी स्वत: उपस्थित राहून आपली बाजू मांडली. ह्यअ‍ॅव्हीडेन्स अ‍ॅफीडेव्हीट  दाखल केले. या प्रतिज्ञापत्रावर आता सुनावणी होणार आहे. यावर समितीने २१ फेब्रुवारी रोजी पुन्हा सुनावणी ठेवली आहे.पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील जमीन पदाचा दुरुपयोग करून नातेवाईकांना दिल्याचा आरोप राज्याचे माजी महसुल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर झाला. याप्रकरणी त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायमूर्ती डी. झोटींग यांची एक सदस्यीय समिती गठित केली. नागपुरातील रविभवन येथील कॉटेज क्रमांक १३ मधून झोटिंग चौकशी समितीचे कामकाज सुरू आहे. गेल्या सात महिन्यापासून ही समिती चौकशी करीत आहे. यादरम्यानसमितीने औद्योगिक विभाग आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांना उत्तर सादर करण्यासाठी बोलावण्यात आले होते. दोन्ही विभागाच्या प्रधान सचिवांनाही समिती समोर हजेरी लावली होती. या चौकशीला होत असलेल्या दिरंगाईवर मुंबईउच्च न्यायालयाने सुुद्धा नाराजी व्यक्त करीत शासनाला चांगलेच धारेवर धरले होते. दरम्यान समितीकडून आता उलट तपासणी सुरू करण्यात आली आहे. खडसे, महसूल आणि औद्योगिक विभागाकडून आपआपला युक्तीवाद वकिलामार्फतसमितीसमोर ठेवण्यात येत आहे. या प्रकरणी खडसेंना उलट तपासणीसाठी चौकशीने नोटीस बजावली असून समितीसमोर हजर राहण्यास सांगितले होते. परंतु आजवर त्यांनी वकीलांमार्फत बाजू मांडल्याने ते स्वत: हजर होतात की नाही याकडेसर्वांचे लक्ष लागले होते. मंगळवारी दुपारी १२ वाजता एकनाथ खडसे हे त्यांचे वकील एम.जी. भांगडे व अ‍ॅड. अमोल पाटील यांच्यासह न्या. झोटिंग समितीच्या कार्यालयात हजर झाले. तब्बल पाऊन तास त्यांनी आपली बाजू मांडली. १२.४० मिनिटांनी ते समितीच्या कार्यालयातून बाहेर पडले. मिळालेल्या माहितीनुसार खडसे यांनी आपल्या साक्षी पुराव्याचे अ‍ॅव्हीडेन्स अ‍ॅफीडेव्हीड सादर केले. यावर आता २१ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. २१ तारखेलाही एकनाथ खडसे स्वत: उपस्थित राहणार आहेत. बाजू मांडली, तारीख मिळालीझोटिंग समितीच्या कार्यालयातून बाहेर पडल्यावर माजी मंत्री एकनाथ खडसे यांना लोकमतने यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी संगितले की, आम्ही आपली बाजू मांडली असून समितीने पुढची तारखी दिली आहे. पुढच्या तारखेला काय होते ते समजेल. माजी मंत्री एकनाथ खडसे हे सुरुवातीला चौकशी समिती समोर हजर झाले नाही. आता सुनावणी पूर्ण झाल्यावर ते हजर झाले. त्यांनी अ‍ॅव्हीडेन्स अ‍ॅफीडेव्हीड सादर केले. त्यामुळे यावर पुन्हा सुनावणी होईल. त्यासाठी पुन्हा नवा ह्यफ्रेमवर्कह्ण करावा लागेल. याला वेळ लागेल. त्याचा अभ्यास करावा लागेल, म्हणून आम्ही वेळ मागितली.अ‍ॅड. जलतारे, एमआयडीसीचे वकील समितीला हवी चौथ्यांदा मुदतवाढन्या. झोटिंग समितीची मूदत १५ फेब्रुवारी रोजी संपत आहे. आतापर्यंत त्यांना तीन वेळा मुदत वाढ मिळाली आहे. समितीचे कामकाज जवळपास पूर्ण होत आले आहे. समितीला पुन्हा सहा आठवड्यांची मुदतवाढ मिळावी यासाठी शासनाला पत्र पठविण्यात आल्याची माहिती आहे.