शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

अखेर कपिल शर्मावर गुन्हा दाखल

By admin | Updated: September 20, 2016 04:50 IST

महापालिकेतील अधिकारी भ्रष्ट असल्याचे ट्विट केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या हास्य अभिनेता कपिल शर्मा याच्यावर अखेर वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

मुंबई : मुंबईतील महापालिकेतील अधिकारी भ्रष्ट असल्याचे ट्विट केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या हास्य अभिनेता कपिल शर्मा याच्यावर अखेर वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधेरीतील वल्लभभाई पटेल नगरात तिवरांची कत्तल करून अनाधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. अंधेरी तहसिलदार कार्यालयातील तलाठ्यांनी त्याबाबत फिर्याद दिली आहे. कपिल शर्माने गेल्या आठवड्यात महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने कार्यालयावरील कारवाई टाळण्यासाठी पाच लाखांची लाच मागितल्याचे ‘व्टिट’ केले होते. त्याचबरोबर गेली तीन वर्षे १५ कोटी रुपये कर भरत असूनही आपल्याकडे लाच मागितली जाते, हेच का अच्छे दिन?, असा उपरोधिक सवाल पंतप्रधान मोदी यांना केला होता. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर राजकीय पडसाद उमटले होते. प्रत्यक्षात कपिलने अंधेरी (प.) येथील म्हाडा कॉलनीतील चार नंबरच्या बंगल्यात अनाधिकृत बांधकाम केले होते. तिवरांच्या सुमारे एक हजार चौरस फुट जागेवर अतिक्रमण करून कार्यालय उभारले होते. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी तक्रार करूनही प्रशासनाकडून कार्यवाही होत नव्हती. त्याच्या ‘ टिष्ट्वट’नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबत वनविभागाकडून अहवाल मागविला. त्यांनी अंधेरी तहसिलदार कार्यालयाला दिलेल्या अहवालात तिवरांची कत्तल केल्याचे नमूद केले होते. तलाठ्याने दिलेल्या तक्रारीनुसार पर्यावरण संरक्षण कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)>कपिल शर्माने चार बंगला परिसरातील ही जागा ७ नोव्हेंबर २०१५ मध्ये बरान आदर्श याच्यांकडून खरेदी केली आहे. त्यानंतर हजारो तिवरे तोडून खड्डा भरला. त्यावर अनाधिकृत बांधकाम केले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.