शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

अंतिम ऊसदराचा फैसला आॅगस्टमध्येच

By admin | Updated: May 21, 2017 00:33 IST

साखर, उपपदार्थ विक्रीची माहिती आॅनलाईन करू : मलिक

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : साखर कारखान्यांचा गत आर्थिक हंगामातील अद्याप हिशेब झालेला नाही. येत्या महिन्याभरात तो पूर्ण करून वाढीव दर किती देता येतो, याची माहिती साखर आयुक्त कार्यालयाला सादर करण्याच्या सूचना शनिवारी मंत्रालयात झालेल्या ऊसदर नियामक मंडळाच्या बैठकीत देण्यात आल्या. त्यामुळे गत हंगामातील उसाचा अंतिम दराचा फैसला आॅगस्टमध्ये होणाऱ्या मंडळाच्या बैठकीतच होणार आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक होते. साखरेसह उपपदार्थ विक्रीची माहिती आॅनलाईन करण्याची सूचना कारखान्यांना देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या बैठकीत ऊसदर, कारखान्यांचे व्यवस्थापन, आदी मुद्द्यांंवर सविस्तर चर्चा झाली. शेतकऱ्यांचे पैसे थकविणाऱ्या कारखान्यांवर आर.आर.सी.ची कारवाई करता येते; पण जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर अंमलबजावणी होत नसल्याने दोन-दोन वर्षे गुजरात दराचीच चर्चागुजरातमधील साखर कारखाने ४४०० रुपये दर देतात, मग येथील कारखान्यांना काय झाले? असा सवाल राजू शेट्टी व रघुनाथदादा पाटील यांनी केला. हे कारखाने दर का देऊ शकतात, याचा पाढा वाचत किमान गुजरातमधील कारखान्यांच्या चांगल्या गोष्टी तरी स्वीकारा, अशी सूचना बैठकीत शेतकरी नेत्यांनी केली. दुसरा हप्ता द्याकारखान्यांची आर्थिक पत्रके निश्चित होण्यास अजून दोन महिन्यांचा कालावधी आहे. यावर्षी एफआरपीपेक्षा जादा दर मिळणार हेही निश्चित असल्याने अंतिम दराचा निर्णय होईपर्यंत कारखान्यांनी दुसरा हप्ता द्यावा, अशी मागणी रघुनाथदादा पाटील यांनी केली. दृष्टिक्षेपात राज्यातील आगामी गळीत हंगाम२०१७ /१८ च्या हंगामात उपलब्ध ऊस क्षेत्र ९.२३ लाख हेक्टर. ७५ लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित.