शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक देखाव्यांवर भर

By admin | Updated: September 4, 2014 00:37 IST

श्रीगणोशाच्या आगमनानंतर मंडळांचे देखावे पाहण्यासाठी गर्दी वाढू लागली आहे. शहरातील अनेक मंडळांनी सामाजिक प्रश्नांसंदर्भातील अनेक विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे,

पुणो : श्रीगणोशाच्या आगमनानंतर मंडळांचे देखावे पाहण्यासाठी गर्दी वाढू लागली आहे. शहरातील अनेक मंडळांनी सामाजिक प्रश्नांसंदर्भातील अनेक विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे, तर कसबा आणि नारायण पेठेत पारंपरिक देखावे साकारण्यात आले आहेत. काही देखावे पाहण्यासाठी गणोशभक्त आवजरून गर्दी करत आहेत.
 
4मानाचा पहिला गणपती असलेल्या कसबा गणपती मंडळाने यंदा भव्य राजप्रसाद साकारला आहे. या ठिकाणी दिवसभर दर्शनासाठी रांग आहे. त्यामागेच असणा:या नवग्रह मित्रमंडळाने 51 फूट उंचीचे देहूचे ‘गाथामंदिर’ साकारले आहे. या मंदिरातील संत तुकारामांची भव्य मूर्ती लक्ष वेधून घेणारी आहे. गावकोस मारुती संस्थेने छत्र्यांच्या साहाय्याने तिरंग्यातील आकर्षक विद्युत रोषणाईचा देखावा उभारला आहे. हाच देखावा विसजर्न मिरवणुकीत वापरण्यात येणार असल्याचे माजी नगरसेवक बुवा नलावडे यांनी सांगितले.
4कसबा माता मंदिराजवळील त्रिमूर्ती मंडळाने ब्रrा, विष्णू, महेशाचे त्रिमूर्ती रूप साकारले आहे. या मंडळाने वृक्षारोपण, कमला नेहरू रूग्णालयातील रूग्णांसाठी विविध उपक्र म राबविले आहेत. पवळे चौकाजवळील समस्त भोईराज मित्रमंडळाने 35 फूट उंचीचे सुवर्णमंदिर उभारले आहे. पवळे चौकातील हुतात्मा भगतसिंग मित्रमंडळाने साकारलेली उंदरावरील गणोशाची सुबक मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याजवळ असणा:या क्रांतिवीर राजगुरू मित्रमंडळाने मल्हाराच्या रूपातील श्रीगणोशाची मूर्ती साकारली आहे. 
4नारायण पेठेतील अहिल्यादेवी शाळेशेजारी असलेल्या वीर मारुती मंडळाने आकर्षक महाल उभारला आहे. रमणबागेजवळील वीराची तालीम मंडळाने ‘सूर्यमुखी स्तंभाचा’ देखावा उभारला आहे. मुठेश्वर मंडळाने ‘पाणी मेघात..तळ्यात आणि डोळ्यात’ हा पाण्याच्या समस्येवरील देखावा साकारला आहे. विजय मारुती मंडळ ट्रस्टने साकारलेले मयूरासन पाहण्यासाठी गर्दी होत आहे. माती गणपतीजवळील भरत मित्रमंडळाने शिवराज्याभिषेक हा जिवंत देखावा डोळ्यांचे पारणो फेडणारा आहे. 
4केसरीवाडय़ाजवळील गायकवाड तालीम संघाचा ‘यमराज’ हा पंधरा फूट उंचीचा देखावा येथील कार्यकत्र्यानी स्वत:च उभारला आहे. डॉ. हेडगेवार चौकातील हनुमान मित्रमंडळ प्रतिष्ठानने ‘पुण्याचे शांघाय’ हा मेट्रो प्रकल्पाचा देखावा साकारला आहे. अनेक ठिकाणी डीजेच्या तालावर जल्लोष सुरू आहे.
 
सामाजिक जाणीव वाढावी
गणोशोत्सवाला पूर्वी धार्मिक आणि राष्ट्रीय स्वातंत्र्यांची पाश्र्वभूमी होती. सध्या या उत्सवाचे स्वरूप बदलत आहे. मात्र, मंडळांनी या उत्सवाचा उपयोग सामाजिक प्रबोधनासाठी अधिक करण्याची गरज आहे.  यातून कार्यकत्र्यामधील सामाजिक जाणीव वाढावी, हा उद्देश आहे.- सुशील आगज्ञान, 
अध्यक्ष, प्रभात प्रतिष्ठान, तांबट हौद
 
सामाजिक देखावे
4राष्ट्रीय साततोटी हौद ट्रस्ट मंडळाने ‘माता-पिता देवो भव’ जिवंत देखाव्यातून समाजातील वृद्धांची समस्या मांडली आहे. दहा कार्यकर्ते अभिनयातून वृद्धांचे प्रश्न मांडणार आहेत. तांबट हौद चौकातील प्रभात प्रतिष्ठानने ‘काळोख्या वाटेवर’ हा तरुणांचे गुन्हेगारीकडे वाढते आकर्षण हा देखावा ऑडिओ-व्हिज्युअलमधून मांडला आहे. 
 
आवजरून पाहावे असे काही देखावे
4 कसबा पेठ : 
मंडळदेखावा
गावकोस मारुती संस्था छत्र्यांमधून विद्युत रोषणाईत साकारलेला तिरंगा
साततोटी हौद मंडळवृद्धांची समस्या नाटिकेतून
समस्त भोईराज मंडळ35 फुटी सुवर्णमंदिर
क्र ांतिवीर राजगुरू मंडळमल्हाराच्या रूपातील गणोशमूर्ती
प्रभात प्रतिष्ठान, तांबट हौद‘काळोख्या वाटेवर’ तरुणांचे गुन्हेगारीवाढ
नवग्रह मित्रमंडळदेहूतील गाथामंदिर
4 नारायण पेठ :
वीराची तालीम मंडळसूर्यमुखी स्तंभ
मुठेश्वर मंडळपाणीसमस्या
माती गणपती मंडळजय मल्हार, खंडोबाचा भव्य रथ
भरत मित्रमंडळशिवराज्याभिषेक
हनुमान मित्रमंडळपुण्याचा मेट्रो प्रकल्प