शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सीएसटी-पनवेल एलिव्हेटेड मार्गावर स्थानकाची भर

By admin | Updated: June 9, 2016 06:14 IST

सीएसटी ते पनवेल या एलिव्हेटेड मार्गावर एका नविन स्थानकाची भर पडणार आहे.

मुंबई : सीएसटी ते पनवेल या एलिव्हेटेड मार्गावर एका नविन स्थानकाची भर पडणार आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मार्गावरुन हा प्रकल्प जाणार असून त्यामध्येच हे नविन स्थानक स्थापन केले जाणार आहे. त्यामुळे अकरा स्थानकांच्या यादीत आणखी एका नविन स्थानकाची भर पडेल. सीएसटी ते पनवेल असा एलिव्हेटेड (उन्नत) मार्ग तयार केला जाणार असून त्यासाठी साधारपणे ११ हजार कोटींपेक्षा जास्त खर्च आहे. या प्रकल्पाचा काहीसा भाग हा मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेतून जाणार आहे. या प्रकल्पाचे काम मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनकडून केले जाणार असून त्याची लांबी ४७ किलोमीटर एवढी आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अंतर्गत येणाऱ्या जमिनींचा पुनर्विकास करण्याची योजना आहे आणि या योजनेत जलक्रिडा, मनोरंजनपर गोष्टी तसेच मोकळ्या जागेचा समावेश आहे. या अनुषंगाने पुनर्विकास करण्याची योजना झाल्यावर पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देण्याची शक्यता असल्याने नविन स्थानक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नविन स्टेशन इंडिया डॉक्सच्या जवळ उभारले जाण्याची शक्यता असून एकच स्थानक उभारले जाईल. त्यामुळे अकरा स्थानकांच्या यादीत आणखी एका स्थानकाची भर पडेल. महत्वाची बाब म्हणजे या नियोजित प्रकल्पात काही प्रमाणात बदल करण्यात येणार असून हा मार्ग मेन्शन मार्गावरुन जाईल. यापूर्वीचा मार्ग पी.डिमेलो मार्गावरुन नेण्यात येणार होता, अशी माहीती सूत्रांकडून देण्यात आली. सीएसटीकडील अठरा क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरुन मेन्शन मार्ग आणि तिथून रे रोडवरुन एलिव्हेटेड मार्ग जाणार आहे.