शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

मनपा आयुक्तांसह जलवर्धन संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Updated: August 16, 2016 20:50 IST

मनपा प्रशासन आणि जलवर्धन संस्थेद्वारे खोदण्यात आलेल्या शोष खड्ड्यातील पाण्यात बुडून रविवारी दोन बालकांचा मृत्यू झाला.

ऑनलाइन लोकमत

अकोला, दि. 16 - आदर्श कॉलनीमधील महापालिकेच्या शाळा क्रमांक १६च्या मैदानावर मनपा प्रशासन आणि जलवर्धन संस्थेद्वारे खोदण्यात आलेल्या शोष खड्ड्यातील पाण्यात बुडून रविवारी दोन बालकांचा मृत्यू झाला. या प्रकरणी खदान पोलिसांनी बालकांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या मनपा आयुक्त अजय लहाने, जलवर्धन संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी, मनपाचे संबंधित अभियंता आणि कंत्राटदार यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या शोषखड्ड्यात सिद्धार्थ राजेश घनगावकर आणि कृष्णा राकेश बहेल या दोन बालकांचा मृत्यू झाला होता.आदर्श कॉलनी परिसरातील मित्रनगरला लागून असलेल्या वसाहतमधील रहिवासी राजेश घनगावकर यांचा मुलगा सिद्धार्थ (७) आणि याच परिसरातील रहिवासी राकेश बहेल यांचा मुलगा कृष्णा (१०) हे दोघे मनपाच्या शाळा क्रमांक १६ च्या मैदानावर खेळत होते. या मैदानावर मनपा प्रशासन आणि जलवर्धन या संस्थेने खोल चर खोदलेले होते. यामध्येच १० फूट खोलीचे तीन शोषखड्डे खोदण्यात आले होते. या शोषखड्ड्यांचे बांधकाम पूर्ण न केल्याने खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. कृष्णा आणि सिद्धार्थ हे दोघे येथे खेळत असतानाच ते शोषखड्ड्यात पडले. शोषखड्ड्यात गाळ असल्याने दोघेही या गाळात फसून त्यांचा मृत्यू झाला. जलवर्धन संस्थेने बांधलेल्या या तीन शोषखड्ड्यांची कामे त्यांनी अर्धवट केली होती. तसेच या शोषखड्ड्यात पाणी साचल्याने त्याला तारेचे कुंपण घेणे गरजेचे होते. मात्र, जलवर्धन संस्थेने ना तारेचे कुंपण घेतले, ना या ठिकाणी धोका असल्याचे फलक लावले. त्यामुळे दोन बालकांचा बळी गेला. जलवर्धन संस्थेने केलेल्या अर्धवट कामामुळे आणि मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दोन चिमुकल्यांचा जीव गेला असून, या प्रकरणी सिद्धार्थचे वडील राजेश घनगावकर यांनी खदान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. या तक्रारीवरून मनपा आयुक्त अजय लहाने, जलवर्धन संस्थेचे अध्यक्ष आणि पदाधिकारी, मनपाचे संबंधित अभियंता, कंत्राटदार यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०४ अ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.------------अधिकाऱ्यांवरील गुन्हे नॉन बेलेबलमनपा आयुक्तांसह जलवर्धन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध खदान पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेले गुन्हे नॉन बेलेबल असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे या प्रकरणातील जलवर्धन संस्थेच्या अध्यक्ष पदाधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांना पोलिसांनी तत्काळ अटक करण्याची मागणी बालकांच्या नातेवाइकांनी केली आहे.