शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदारावर गुन्हा दाखल

By admin | Updated: March 2, 2015 09:50 IST

गेल्या काही दिवसांपासून शहरात उभारण्यात येणाऱ्या ‘फोर जी’ टॉवरविरोधात रहिवाशांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शहरात उभारण्यात येणाऱ्या ‘फोर जी’ टॉवरविरोधात रहिवाशांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राजकीय नेत्यांनीही या टॉवरना विरोध दर्शवला आहे. त्यामुळे रहिवाशांचा विरोध असताना धमकावत टॉवर उभारणाऱ्या रिलायन्स कंपनीच्या कंत्राटदारावर आज, रविवारी मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.मोबाइलच्या रेडिएशन्समुळे अनेक घातक आजार होत असल्याने अनेक रहिवाशांनी इमारतींवरील असलेले मोबाइल टॉवर काढून टाकले आहेत. त्यामुळे सध्या इमारतींवर मोबाइल टॉवर्सना जागाच मिळत नसल्याने पालिकेच्या मैदानांवर ‘फोर जी’ टॉवर उभारण्याचा घाट सध्या शहरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. खेळाच्या मैदानांवर अशा प्रकारे टॉवर उभारल्यास त्यामधून निघणाऱ्या रेडिएशन्समुळे लहान मुलांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. त्यामुळे चेंबूरनंतर भांडुप आणि मुलुंडमधील रहिवाशांनी या ‘फोर जी’ टॉवरना विरोध दर्शवला आहे. त्यामुळे कंत्राटदार एन. के. सिंह आणि त्याच्या साथीदारांनी रहिवाशांना धमकावले. त्यानुसार आज मुलुंड पोलिसांनी कंत्राटदारासह एका अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)