शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीविरोधात लढा उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2016 02:05 IST

सहकारी बँकांवरील गैरव्यवहाराचे आरोप फेटाळून लावत राष्ट्रीयकृत बँकांमध्येच सर्वाधिक घोटाळे झाल्याचा आरोप शरद पवार यांनी येथे केला़ सरकारच्या नोटाबंदीविरोधात

अहमदनगर : सहकारी बँकांवरील गैरव्यवहाराचे आरोप फेटाळून लावत राष्ट्रीयकृत बँकांमध्येच सर्वाधिक घोटाळे झाल्याचा आरोप शरद पवार यांनी येथे केला़ सरकारच्या नोटाबंदीविरोधात लोकशाही मार्गाने लढा उभारण्याची घोषणाही त्यांनी केली़जिल्हा सहकारी बँकेच्या नूतनीकृत यशवंतराव चव्हाण सभागृहाचे उद्घाटन गुरुवारी पवार यांच्या हस्ते झाले़ त्यावेळी ते बोलत होते़ माजी मंत्री बाळासाहेब थोरात अध्यक्षस्थानी होते. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, माजी मंत्री मधुकरराव पिचड, बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार व्यासपीठावर उपस्थित होते. सरकारने नोटाबंदीचे आॅपरेशन बरोबर केले, मात्र आॅपरेशनंतरची काळजी नीट घेतली नाही असे पवार म्हणाले. या निर्णयामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. सहकारी बँकांना चलन दिले जात नाही व त्यांच्याकडील जुने चलन घेतले जात नसल्याने या बँकाही अडचणीत आहेत. अनेक उद्योजकांनी कामगार कपात सुरु केली आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास देशातील कायदा व सुव्यवस्था बिघडेल, असा धोका त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रीयकृत व सहकारी बँका या दोघांनाही आरबीआयने परवाना दिलेला आहे. असे असतानाही केंद्र सरकारने सहकारी बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्यास बंदी केली. सहकारी बँका भ्रष्ट आहेत, हा आरोप माजी केंद्रीय अर्थमंत्री पी़ चिदंबरम यांनी न्यायालयात पुराव्यानिशी खोडून काढला. गत १५ वर्षांत सहकारी बँकांची २४०, तर राष्ट्रीयकृत बँकांतील घोटाळ्यांची ३ हजार ५०० प्रकरणे आहेत. तरीही सहकारी बँकांबाबत संशय निर्माण केला जात आहे. हा सहकार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न आहे,अशी टीकाही पवार यांनी केली. (प्रतिनिधी)ओबीसी मंत्रालयाच्या निर्णयाचे स्वागत- राज्य सरकारने ओबीसी मंत्रालय सुरु करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. ओबीसी तसेच अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणाला धक्का न लावता इतरांना आरक्षण द्या, अशी आपली प्रारंभीपासूनची भूमिका आहे, असे पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले. - मराठा मोर्चांच्या पार्श्वभूमीवर सरकारने जाणीवपूर्वक ओबीसी मंत्रालय काढले का? असा प्रश्न केला असता त्यांनी उत्तर देणे टाळले. प्रशासकीय पातळीवर काय झाले ते आपणाला माहित नाही, असे ते म्हणाले.