शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
2
साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ!
3
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
4
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
5
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
6
खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा
7
ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण
8
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
9
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
10
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
11
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
12
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
13
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
14
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
15
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
16
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
17
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
18
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
19
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
20
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता

भरदिवसा व्यापार्‍यांचे ७ लाख लुटले

By admin | Updated: May 15, 2014 22:43 IST

वाशिम शहरामधील दोन व्यापार्‍यांकडून अज्ञात चोरट्यांनी बँकपरिसरामधून ७ लाख २0 हजार रूपये लुटून नेले.

वाशिम : शहरामधील दोन व्यापार्‍यांकडून अज्ञात दोन चोरट्यांनी बँक परिसरामधून ७ लाख २0 हजार रूपये लुटून नेले. या घटना जुना रिसोड नाक्यावरील जनता बँक समोर व विशाल स्कुटर समोर आज १५ मे रोजी दुपारी १२ वाजताचे सुमारास घडल्या. प्राप्त माहितीनुसार पाटणी चौकामध्ये असलेल्या रेणुका कॅफेचे संचालक १दिपक श्यामसुंदर मंत्री यांनी दररोज प्रमाणे दुकानामध्ये जमा झालेली रक्कम ३ लाख रूपये नोकर दत्ता लक्ष्मण लादे याचेकडे युको बँकमध्ये भरण्यासाठी दिली. दत्ता लादे याने ३ लाख रूपये भरलेली पिशवी आपल्या सायकलला लटकवून रिसोड रोडवर असलेल्या युको बँकेच्या दिशेने सकाळी ११:१0 वाजता जात होता. दरम्यान, पाठीमागुन मोटसायकलवर दोन अज्ञात युवक आले. त्यांनी लादे याच्या हातावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. लादे याला काही कळण्याअगोदर दोन भामट्यांनी लादे जवळ असलेली तीन लाख रूपयाची पिशवी लंपास करून पोबारा केला. दुसर्‍या एका घटनेमध्ये शुक्रवार पेठेमध्ये वास्तव्यास असलेले व्यापारी रूपेश राधेशाम मालपाणी यांनी जुना रिसोड नाका परिसरात असलेल्या जनता बँकेमधून चार लाख २0 हजाराची रोकड विड्रॉल केली. ही रोकड एका पिशवीमध्ये ठेवून त्यांनी बाहेर उभ्या केलेल्या स्विफ्ट कारमधील ड्रायव्हर सिटच्या बाजूला ठेवून निघत होते. यावेळी अचानक एका युवकाने कारच्या काचा जोरात वाजवून ह्यसाहेब मागे पहा काय झालेह्ण असे म्हणताच मालपाणी यांनी मागे पाहले तर काहीच घडलेले त्यांना दिसले नाही. लगेच त्यांनी आपल्या सिटवर ठेवलेली रोख रकमेची पिशवी सुरक्षीत आहे का पाहले असता त्याठिकाणाहून पिशवी लंपास केल्याचे आढळून आले. उपरोक्त दोघांनीही चोरट्यांचा शहर व परिसरात शोध घेतला मात्र चोरटे मिळून आले नाही. वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये दिपक मंत्री व रूपेश मालपाणी यांनी फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द भादंविचे कलम ३९४ नुसार गुन्हा दाखल केला.व्यापार्‍यांना लुटण्याच्या घटनेने शहरातील व्यापार्‍यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.