शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

पाचगणीत बालकाला कोंडून बदडले !

By admin | Updated: August 11, 2015 22:46 IST

अंगावर वळ : वसतिगृहचालकाविरुद्ध मुंबईत गुन्हा दाखल

पाचगणी : ‘एज्युकेशन हब’ मानल्या गेलेल्या पाचगणीत एका वसतिगृहाच्या चालकाने अल्पवयीन विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित मुलाच्या पालकांनी चेंबूर, मुुंबई येथील पोलीस ठाण्यात संबंधित वसतिगृहचालकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. हा गुन्हा मंगळवारी पाचगणी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. चेंबूर व पाचगणी येथील पोलीस ठाण्यांतून मिळालेल्या माहितीनुसार, कबीर सुरेंद्र सिंह (वय ६, रा. निरावली, ता. जि. ग्वाल्हेर, मध्य प्रदेश) हा पूर्वी नितू रवीसिंह (२५ रा. रूम नंबर २५४, आर सी बॅरेक, रामापूर चेंबूर, मुुंबई, ७४) या आपल्या बहिणीबरोबर मुंबईत राहत होता. कबीरला चांगले शिक्षण मिळावे म्हणून पाचगणीत ठेवले होते. या ठिकाणावरील एका नामवंत शाळेत त्याला दाखल केल्यानंतर त्याला येथीलच आराध्य इंटरनॅशनल होस्टेलमध्ये ठेवले होते. कबीर पहिलीत शिकत आहे. नितू सिंह मुंबईत राहते. ९ आॅगस्ट रोजी नितू कबीरला भेटण्यासाठी पाचगणीत आली होती. होस्टेलमध्ये नितू गेल्यावर होस्टेलचालक मल्हारी जाधवने ‘तुमचा मुलगा शाळेमध्ये भांडण करतो,’ असे सांगितले. तेव्हा नितूने कबीरला दोन दिवसांसाठी मुंबईला नेण्याचा निर्णय घेतला. प्रवासादरम्यान जेवायला थांबले असता कबीरने नितूला सांगितले की, ‘मला दोन दिवस जेवणच दिले नसल्याने मी उपाशी होतो. सरांनी मला बाथरूममध्ये बांधून बंद करून ठेवले होते.’ या सर्व प्रकाराने कबीर खूप घाबरला होता. याबाबत होस्टेलचालकावर कारवाई व्हावी, अशा आशयाची तक्रार चेंबूर पोलीस ठाण्यात दाखल केली. सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी तपास करीत आहेत. (वार्ताहर) खासगी रुग्णालयात उपचारचेंबूर येथे घरी गेल्यावर कबीरने कपडे काढले असता कबीरच्या कमरेच्या खाली, मांडीवर, हातावर, कपाळावर व डोळ्याच्या बाजूला मारहाणीचे वळ दिसले. यासंदर्भात कबीरला विचारले असता मल्हारी जाधव व सुप्रिया नावाच्या व्यक्तीने काठीने मारले असून, त्याचे हे वळ असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर नितूने कबीरला खासगी रुग्णालयात दाखल केले.