जितेंद्र दखणे, अमरावतीआगामी शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पाचवीच्या अभ्यासक्रमात बदल केला असून, तीन विषयांचे एकत्रीकरण करून एकच पुस्तक तयार करण्यात आले आहे. पूर्वी आठ विषयांची आठ पुस्तके घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागत होते. नव्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी होणार असून, त्यांना दिलासा मिळाला आहे. दप्तराच्या वाढत्या ओझ्या संदर्भात गेल्या दोन वर्षांपासून पालक आणि शिक्षक चिंतेत होते. याची दखल घेत पुस्तकांची संख्या कमी करून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया मजबूत करण्यासाठी नवीन अभ्यासक्रमांची आखणी करण्यात आली आहे. आता सर्वच अभ्यासक्रमांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. आहे. पूर्वी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व अभ्यासेतर मूल्यमापन सहा महिन्यांनी अथवा वार्षिक होत होते. नवीन अभ्यासक्रमानुसार आता विद्यार्थ्यांचे नियमित मूल्यमापन होईल. यात विद्यार्थ्यांच्या कमकुवत बाजूंचा अभ्यास करून त्या सोडविण्याचा विचारही होईल.
पाचवीच्या दप्तराचे ओझे घटले!
By admin | Updated: May 8, 2015 01:53 IST