शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
3
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
4
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
5
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
6
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
7
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
8
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
9
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
10
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
11
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
12
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
13
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
14
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
15
Jaipur Couple Video: रोमान्समध्ये इतके झाले तल्लीन की..., जयपूरमधील कपलचा हॉटेलमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
16
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
17
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
18
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
19
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
20
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं

मेथीने दिले महिन्यात सव्वा लाख

By admin | Updated: July 1, 2016 02:09 IST

शेतकरी रघुनाथ नामदेव गाडे यांनी अवघ्या ३० गुंठे क्षेत्रामध्ये ३०-३२ दिवसांत जवळपास खर्च जाऊन निव्वळ सव्वा लाखाचे उत्पन्न घेतले

देहूगाव : येलवाडी (ता. खेड) येथील प्रगतिशील शेतकरी रघुनाथ नामदेव गाडे यांनी अवघ्या ३० गुंठे क्षेत्रामध्ये ३०-३२ दिवसांत जवळपास खर्च जाऊन निव्वळ सव्वा लाखाचे उत्पन्न घेतले आहे.तरुणांना योग्य वेळी योग्य पीक घेतल्यास शेती कशी किफायतशीर होते, याचे चांगले उदाहरण माजी ग्रामपंचायत सदस्य गाडे यांनी घालून दिले आहे. गाडे यांनी पारंपरिक ऊस, कांदे, भुईमूग, बाजरी, गहू अशा पिकांना फाटा देऊन सुधारित वाणाच्या मेथीचे पीक घेऊन हे उत्पन्न मिळविले आहे. गेल्या काही वर्षात पाऊस कमी झालेला असल्याने पाण्याअभावी शेतकऱ्यांचे पुरते कंबरडे मोडले असल्यानेशेती करावी की न करावी, अशा द्विधा मन:स्थितीत गाडोरखे अनेक शेतकरी आहेत. मात्र, गाडे यांनी पारंपरिक, भरपूर पाण्यावर घेतली जाणारी पिके न घेता कमी दिवसांत कमी पाण्यावर येणारे मेथी हे पीक निवडले. त्यांनी ३० गुंठे क्षेत्रावर ६६ गादी वाफे तयार केले. या गादी वाफ्यांमध्ये ९० किलो सुधारित वाणाचे बी पेरले. बियाणासाठी त्यांना सुमारे १० हजार रुपये खर्च आला. पंधरा दिवसांनी एकदा औषध फवारणी करून अडीच हजार रुपयांचे शंभर किलो रासायनिक खत टाकले. यामुळे या भाजीला कोणत्याही प्रकारचा रोगाचा प्रादुर्भाव न होता भाजी झपाट्याने वाढली व अवघ्या तीस ते बत्तीस दिवसांत मेथी काढणीयोग्य झाली. दरम्यानच्या काळात मेथीला मागणी वाढल्याने प्रती शेकडा किमान १५०० ते १८०० रुपये असा दर मिळाला. यामुळे सुमारे नऊ ते साडेनऊ हजार जुडी मेथी निघाली. सुमारे वीस हजार रुपये खर्च आला. (वार्ताहर)>चांगला बाजारभाव, पिकाचा कालावधी बदलून घेतलेले पीक, कमी पाणी व कमी खर्च या कारणांनी गाडे यांनी अवघ्या महिनाभरात सर्व खर्च जाऊन सव्वा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याने समाधान व्यक्त केले. शेतकऱ्यांना पिकांची योग्य निवड, योग्य वेळ साधल्यास शेती कशी किफायतशीर होते, याचे उदाहरण घालून दिले. बागायती शेतीसाठी पाण्याला पर्याय नसला, तरी योग्य पाण्याचे योग्य नियोजन व योग्य पिकाची निवड, वेळेचे व्यवस्थापनाने शेती किफायतशीर ठरते, हे त्यांनी पटवून दिले आहे.