शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

देहरंगमध्ये पंधरा दिवसांचा पाणीसाठा

By admin | Updated: June 6, 2017 02:26 IST

पनवेल महानगरपालिकेने केलेल्या उत्तम नियोजनामुळे देहरंग धरणात अद्याप जवळपास पंधरा दिवस पुरेल इतका पाणीसाठा आहे.

अरूणकुमार मेहत्रे । लोकमत न्यूज नेटवर्ककळंबोली : पनवेल महानगरपालिकेने केलेल्या उत्तम नियोजनामुळे देहरंग धरणात अद्याप जवळपास पंधरा दिवस पुरेल इतका पाणीसाठा आहे. त्यामुळे पाऊस पडेपर्यंत टंचाई भासणार नसल्याचे पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे. दीड महिन्यापासून धरणातून दररोज दहा एमएलडी पाणी घेतले जात आहे. तीन दिवस रोज आणि इतर वेळी दिवसाआड पाणीपुरवठा करून प्रशासनाने उत्तम नियोजन केले आहे. ते एमएजेपीकडून मागणीप्रमाणे पाणीपुरवठा होत नसताना त्यामुळे पनवेलकरांना यंदा फारसे टंचाईला सामोरे जावे लागले नाही.पनवेल महापालिकेच्या मालकीच्या देहरंग धरणातून जुलै ते मार्च महिन्यांत १० ते १२ एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येतो. त्याचबरोबर उर्वरित पाणी एमजेपी आणि एमआयडीसीकडून घेण्यात येते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हा महापालिकेला पाण्याचा मुख्य स्रोत आहे, त्याशिवाय पनवेलकरांची तहान पालिका प्रशासन भागवू शकत नाही; परंतु एमजेपीची वाहिनी जीर्ण झालेली असल्याने तिला फुटीचे ग्रहण लागले आहे. तसेच टाटा पाँवर कंपनीकडून सुट्टीच्या दिवशी पाताळगंगा नदीत पाणी सोडले जात नसल्याने पात्रात पाण्याची कमरता भासत आहे. यामुळे एमजेपीला मागणीप्रमाणे पाणीपुरवठा करता येत नाही. त्यामुळे शहरवासीयांनासुद्धा पूर्वीप्रमाणे मुबलक पाणी देता येता नाही. पनवेल शहराला सुमारे २७ एमएलडी पाण्याची गरज आहे. आजघडीला एमजेपी आणि एमआयडीसीकडून प्रत्येकी ८ आणि ७ एमएलडी पाणी प्राप्त होत आहे. म्हणजे एकूण १५ एमएलडी पाणी बाहेरून प्राप्त होत आहे. त्याच पाण्यावर पनवेलकरांची तहान भागविण्यात येत होती. झोन करून दिवसाआड पाणी देण्यात येत होते. एप्रिल महिन्यात तीन दिवस नियमित पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पाणीपुरवठा विभागाने घेतला.मंगळवार, बुधवार, गुरुवार दररोज पाणी दिले जातेय, याअगोदर पनवेलकरांना दिवसाआड पाणी दिले जात होते. २५ एप्रिलपासून तीन दिवस नियमित म्हणजेच दररोज पाणी देण्यास सुरुवात झाली. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत देहरंग धरणाचे पाणी बचत करून ठेवून त्याचा वापर उन्हाळ्यात, त्याचबरोबर एमजेपीच्या शटडाउनच्या काळात करण्याचे धोरण आखण्यात आले होते. त्यानुसार धरणात साडेचारशे एमएलडी पाणीसाठा शिल्लक होता. गेल्या सव्वामहिन्यापासून दहा एमएलडी पाणी देहरंगमधून घेतले जात आहे. तीन दिवस २७ ते २८ एमएलडी पाणी पनवेल शहरात देता येत आहे. चार दिवस १७ ते १८ एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे. तरीही अद्याप पंधरा दिवस पुरेल म्हणजे, दीडशे एमएलडीपेक्षा जास्त पाणीसाठा धरणात शिल्लक असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.