शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपट कलावंतांचे करारही मुद्रांकाच्या कार्यक्षेत्रात

By admin | Updated: May 19, 2016 06:14 IST

चित्रपट अभिनेत्यांचे निर्मात्यांबरोबरचे कोट्यवधी रुपयांचे करार आता राज्य शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या कार्यक्षेत्रात येणार आहेत.

राहुल कलाल,

पुणे- चित्रपट अभिनेत्यांचे निर्मात्यांबरोबरचे कोट्यवधी रुपयांचे करार आता राज्य शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या कार्यक्षेत्रात येणार आहेत. करारांची नोंद करणे आवश्यक असते. त्यामुळे नोंदणी व मुद्रांक विभाग त्याची तपासणी करणार आहे. प्रसंगी चित्रपट निर्मिती कंपन्यांवर छापे टाकून कागदपत्रांची तपासणी करण्यात येईल.देशातील सर्वात मोठा चित्रपट उद्योग मुंबईत आहे. त्यामुळे चित्रपट निर्मिती कंपन्यांची कार्यालयेही तेथे आहेत. अलीकडे चित्रपटांतील अभिनेते, अभिनेत्री व इतर कलावंतांचे निर्मिती कंपन्यांबरोबर कोट्यवधींचे करार होतात. नवीन चित्रपट आल्यानंतर कराराची चर्चा रंगते. टीव्ही मालिकांच्या कलावंतांनाही चांगला पैसा मिळतो. तेथेही कलावंतांसोबत करार करण्यात येतात. कागदोपत्री करार झाले तर त्याची, नोंदणी व मुद्रांक विभागाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे.कराराच्या कागदपत्रांची नोंदणी करून त्यापोटी येणारे नोंदणी व मुद्रांक शुल्क भरणेही बंधनकारक आहे. करार किती रूपयांचा करण्यात आला आहे त्यावर हे शुल्क ठरविले जाते. मात्र हे शुल्क वाचविण्यासाठी चित्रपट निर्मिती कंपन्या, कलावंत कराराच्या नोंदीच करीत नाहीत. त्यामुळे राज्य शासनाचा कोट्यवधी रूपयांचा महसूल बुडत आहे. महसूल मिळविण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाने तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक एन. रामास्वामी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, मुंबईत चित्रपट उद्योगाची पंढरी आहे. महसूल मिळविण्यासाठी चित्रपट निर्मात्या कंपन्याच्या तपासण्या करण्यात येणार आहेत. कलाकारांचे करारही तपासण्यात येणार आहेत.