शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

पुढच्या वर्षी बेस्ट करणार दोन वेळा भाडेवाढ

By admin | Updated: October 22, 2014 06:13 IST

निवडणुकीचे वर्ष सरताच बेस्टने भाडेवाढीचा डबल बार उडविण्याची तयारी केली आहे़ अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर बेस्ट उपक्रमाने सन २०१५-२०१६ या आर्थिक वर्षात ९४६ कोटी ३२ लाख रुपये शिलकी दाखविली आहे़

मुंबई : निवडणुकीचे वर्ष सरताच बेस्टने भाडेवाढीचा डबल बार उडविण्याची तयारी केली आहे़ अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर बेस्ट उपक्रमाने सन २०१५-२०१६ या आर्थिक वर्षात ९४६ कोटी ३२ लाख रुपये शिलकी दाखविली आहे़ मात्र कामगारांची थकबाकी आणि कर्जाची परतफेड करण्यातच ही रक्कम खर्च होत असल्याने पुढच्या वर्षी दोन वेळा भाडेवाढ प्रस्तावित आहे़ त्यानुसार तिकिटांच्या दरात दोन रुपये तर मासिक पासमध्ये ३० ते ४० रुपये वाढ करण्याची शिफारस प्रशासनाने केली आहे़विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे गेल्या आठवड्यात बेस्ट प्रशासनाने सीलबंद अर्थसंकल्प समितीला सादर केला होता़ बेस्ट समितीच्या आजच्या बैठकीत हा अर्थसंकल्प उघडण्यात आला़ मात्र हा अर्थसंकल्प शिलकी असल्यानंतरही बेस्टचे आर्थिक दुखणे संपलेले नाही़ त्यामुळे फेब्रुवारी आणि एप्रिल २०१५ अशी दोन वेळा भाडेवाढ करण्याची शिफारस प्रशासनाने केली़ यापैकी एका भाडेवाढीतून मुंबईकरांची सुटका करण्यासाठी गतवर्षीप्रमाणे दीडशे कोटी अनुदान द्या, अशी गुगलीच बेस्टने पालिकेपुढे टाकली़ तिसऱ्या वर्षीही बोनस नाहीइंधन व सुट्ट्या भागांच्या दरात सतत होणारी वाढ तसेच महागाई अशी अनेक कारणं देत प्रशासनाने बेस्ट कामगारांना सलग तिसऱ्या वर्षी सानुग्रह अनुदान नाकारले आहे़ त्यामुळे बेस्टमधील ४४ हजार कामगार-अधिकाऱ्यांचा यंदाच्या दिवाळीतही हिरमोड झाला आहे़बेस्ट उपक्रमाचा आर्थिक डोलारा ढासळला असल्याने कामगारांचे दर महिन्याचे वेतन मिळण्यासही २० दिवसांचा विलंब होत आहे़ मात्र सन २०१५-२०१६ च्या अर्थसंकल्पात बेस्ट उपक्रम ९४६ कोटींच्या शिलकीत आल्यामुळे यंदा सानुग्रह अनुदान मिळण्याची आशा कामगारांना होती़ यासाठी कामगारांनी सोमवारी आझाद मैदानात आंदोलनही केले होते़परंतु अर्थसंकल्प शिलकीत असला तरीही रक्कम बँकेचे कर्ज आणि सुधारित वेतनश्रेणीची थकबाकी चुकती करण्यात संपणार आहे़ त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे यंदाही कामगारांना सानुग्रह अनुदान देता येणार नाही, अशी भूमिका बेस्ट प्रशासनाने घेतली आहे़ तशी अर्थसंकल्पातही सानुग्रह अनुदानासाठी तरतूद करण्यात आलेली नाही़ (प्रतिनिधी)