शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
4
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
5
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
6
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
7
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
8
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
9
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
10
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
11
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
12
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
13
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
14
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
15
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
16
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
17
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
18
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
19
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
20
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
Daily Top 2Weekly Top 5

फातिमा मातेच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ

By admin | Updated: October 18, 2016 02:58 IST

ख्रिश्चन धर्मीयांचे प्रार्थना मंदिर (चर्च ) गेल्या काही दशकांपासून फातिमा माऊलीच्या नावाने प्रसिद्ध आहे.

कर्जत : येथील ख्रिश्चन धर्मीयांचे प्रार्थना मंदिर (चर्च ) गेल्या काही दशकांपासून फातिमा माऊलीच्या नावाने प्रसिद्ध आहे. प्रत्येक वर्षी १३ आॅक्टोबरनंतर येणाऱ्या रविवारी या मातेची तीर्थयात्रा असते. यंदा रविवारी १६ आॅक्टोबर रोजी ही ८१ वी तीर्थयात्रा उत्साहात संपन्न झाली. देश-विदेशातून आलेल्या भाविकांनी मातेचे दर्शन घेतले.कर्जत रेल्वे स्थानकानजीक असलेल्या चर्चच्या परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. सकाळी रायगड धर्म प्रांतचे फादर झेवियर देवदास आणि फादर सॅम्युवेल रायर यांच्या हस्ते फातिमा मातेची पूजा व प्रार्थना करण्यात आली. चर्चचे प्रमुख फादर कॅलीस्टर फर्नांडिस यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. फादर सायमन बोर्जीस यांच्या मार्गदर्शनाखाली बँड पथकाच्या तालावर फातिमा मातेची मिरवणूक काढण्यात आली. या वेळी ख्रिश्चन धर्मीयांबरोबरच अन्य धर्मीय भाविकांनीही जागोजागी मातेच्या पुतळ्यावर फुलांचा वर्षाव केला. त्यानंतर फादर बार्थोल मच्याडो यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. माजी नगराध्यक्ष राजेश लाड, माजी उपनगराध्यक्ष लालधारी पाल, मिलिंद चिखलकर, नगरसेवक सोमनाथ ठोंबरे आदींनी माऊलीची प्रार्थना केली. गुड शेफर्ड, डॉन बास्को आदी या शाळांच्या विद्यार्थ्यांनी शिक्षिकांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्यक्र म सादर केले. दुपारी फादर टोनी प्रेम व फादर अँन्थोनी डिसोझा यांनी आरोग्य दान प्रार्थना केली. मुख्य मिसा फादर इलियास डिकुना यांनी व्याख्यानातून मार्गदर्शन केले. सायंकाळी योहाना क्षीरसागर, कार्लस कसबे यांनी भजन कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सनी डिमेलो, सिल्विस्टर फ्रान्सिस, विल्सन पानपाटील, विक्टर मास्करेन्स, लेन्सची कोलेसो,जेम्स जेकब, इग्नेसेस टपले, नेल्सन फ्रान्सिस आदींसह असंख्य ख्रिश्चन बांधव उपस्थित होते. (वार्ताहर)>मिरवणुकीत मातेच्या पुतळ्यावर फुलांचा वर्षाव फादर सायमन बोर्जीस यांच्या मार्गदर्शनाखाली बँड पथकाच्या तालावर फातिमा मातेची मिरवणूक काढण्यात आली. या वेळी ख्रिश्चन भाविकांनीही जागोजागी मातेच्या पुतळ्यावर फुलांचा वर्षाव केला.रविवारी सायंकाळी योहाना क्षीरसागर, कार्लस कसबे यांनी भजन कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सनी डिमेलो, सिल्विस्टर फ्रान्सिस आदी उपस्थित होते.