शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

एफसी बार्सिलोनाची मुंबईत एन्ट्री

By admin | Updated: August 26, 2016 03:44 IST

लिओनेल मेस्सी, नेमार आणि लुईस सुआरेज अशा स्टार फुटबॉलर्सचा क्लब अशी ओळख असलेल्या एफसी बार्सिलोना या क्लबने नुकताच मुंबईमध्ये एन्ट्री केली

मुंबई : लिओनेल मेस्सी, नेमार आणि लुईस सुआरेज अशा स्टार फुटबॉलर्सचा क्लब अशी ओळख असलेल्या एफसी बार्सिलोना या क्लबने नुकताच मुंबईमध्ये एन्ट्री केली आहे. विशेष म्हणजे ६ ते १८ वयोगटातील गुणवान मुंबईकर खेळाडूंना थेट बार्सिलोना क्लबच्या एफसीबीइस्कोला स्कूलमधून फुटबॉल प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.बुधवारी मुंबईतील नरिमन पॉइंट येथे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये एफसी बार्सिलोना क्लबने आपल्या या उपक्रमाची माहिती देताना क्लबच्या जर्सीचे अनावरणही केले. या उपक्रमाअंतर्गत शहरमध्ये माटुंग्याच्या डॉन बॉस्को हायस्कूल, तर उपनगरमध्ये अंधेरीच्या सेंट डॉमनिक साव्हिओ हायस्कूल येथे शिबीराला सप्टेंबरच्या मध्यंतराला सुरुवात होईल, अशी माहिती आयोजकांनी दिली.एफसी बार्सिलोनाच्या या विशेष उपक्रमातून सुमारे हजार नवोदित फुटबॉलपटूंना शिकण्याची संधी मिळणार असून याआधी एफसी बार्सिलोनाने नवी दिल्लीत घेतलेल्या शिबीरालाही मोठा प्रतिसाद मिळाला होता. तसेच २०१३ साली एफसीबीच्या वतीने झालेल्या पाच दिवसीय शिबीरात जवळपास २०० युवा फुटबॉलपटूंनी सहभाग नोंदवला होता.‘‘हा उपक्रम मोठा असून सुमारे ३६ आठवड्यांचा असेल. बार्सिलोनाच्या या शिबीरासाठी दोन्ही केंद्रामध्ये आवश्यक सोयीसुविधा पुरवल्या गेल्या आहेत. मुंबई शहर व उपनगरातील दोन्ही केंद्रांमध्ये प्रत्येकी निवडक ५०० फुटबॉलपटूंचा सहभाग असेल. तसेच हे शिबीर ६-१८ वयोगटातील मुलांसाठी खुले आहे, असे कॉन्सिएंट फुटबॉलच्या संचालिका अनुपमा जैन यांनी यावेळी सांगितले. (क्रीडा प्रतिनिधी)