शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

मॉन्सून वाटचालीसाठी अनुकूल स्थिती

By admin | Updated: May 23, 2017 05:32 IST

आग्नेय बंगालचा उपसागर व लगतच्या विषुववृत्तीय हिंदी महासागरावर चक्रवात असल्याने नैर्ऋत्य मोसमी पावसाची वाटचाल नैर्ऋत्य, आग्येन व पूर्व-मध्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : आग्नेय बंगालचा उपसागर व लगतच्या विषुववृत्तीय हिंदी महासागरावर चक्रवात असल्याने नैर्ऋत्य मोसमी पावसाची वाटचाल नैर्ऋत्य, आग्येन व पूर्व-मध्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात होण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. तसेच, विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. दरम्यान, राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद चंद्रपूर येथे ४६.६ अंश सेल्सिअस, तर सर्वांत कमी किमान तापमान १७.६ अंश सेल्सिअस अहमनगर येथे नोंदविले गेले.विदर्भात तुरळ ठिकाणी उष्णतेची लाट कायम असून येत्या २४ मेपर्यंत गोव्यासह राज्यात हवामान कोरडे राहणार आहे. येत्या २५ मे रोजी मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून २६ मे रोजी दक्षिण कोकण- गोवा, दक्षिण मध्य- महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे परिसरात येत्या २६ मेपर्यंत आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर, २७ मे रोजी दुपारनंतर गडगडाटी ढग तयार होण्याची शक्यता असून २८ मे रोजी काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.राज्याच्या प्रमुख शहरांमधील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) पुणे : ३८.८, लोहगाव : ३९.२, अहमदनगर : ४०.७ , जळगाव : ४१.२, कोल्हापूर : ३७.८, महाबळेश्वर : ३२.१, नाशिक : ३८.०, सांगली : ३९.५, सातारा : ३८.९, सोलापूर : ४१.९, मुंबई : ३३.७, अलिबाग : ३२.९ , रत्नागिरी : ३४.५, पणजी : ३४.८, औरंगाबाद : ४0.४, परभणी : ४२.८, डहाणू : ३४.३, अकोला : ४३.३, अमरावती : ४१.२, बुलडाणा : ४०.२, ब्रह्मपुरी : ४५.३, चंद्रपूर : ४६.६, गोंदिया : ४३.८, नागपूर : ४४.९, वाशिम : ४१.८, वर्धा : ४४.२, यवतमाळ : ४२.५.