शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

रिक्षाचालकाचा मुलगा बनला फौजदार

By admin | Updated: May 23, 2017 05:26 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने खात्याअंतर्गत नुकत्याच घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षकाच्या (फौजदार) परीक्षेत सावरगाव (ता. मुळशी) येथील सामान्य कुटुंबातील रिक्षाचालक सुरेश श्रीपती साठे

लोकमत न्यूज नेटवर्कपिरंगुट : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने खात्याअंतर्गत नुकत्याच घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षकाच्या (फौजदार) परीक्षेत सावरगाव (ता. मुळशी) येथील सामान्य कुटुंबातील रिक्षाचालक सुरेश श्रीपती साठे यांचा मुलगा सुधीर सुरेश साठे यांनी खात्याअंतर्गत झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विभागीय परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवीत उत्तीर्ण होऊन आपल्या वडिलांचे आपला मुलगा पोलीस अधिकारी व्हावा हे पाहिलेले स्वप्न पूर्ण केले.सावरगाव (ता. मुळशी) येथील रिक्षाचालक सुरेश श्रीपती साठे यांना दोन मुलगे व मुलगी आहे. त्यांनी हलाखीच्या परिस्थितीमध्ये रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा गाडा चालविला व आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले.त्यातच मुलगा फौजदार व्हावा, ही त्यांची तीव्र इच्छा होती. त्यामध्येच त्यांचा मुलगा सुधीर हे २००८ मध्ये राज्य राखीव बल गट क्रमांक १ पुणे या ठिकाणी पोलीस दलात भरती झाला. परंतु पोलीस शिपाईपदावर समाधान न मानता आपण पोलीस अधिकारीपदावर रुजू व्हावे, हे वडिलांचे स्वप्न असल्यामुळे सुधीर यांनी आपले कर्तव्य सांभाळत मोठ्या जिद्द व चिकाटीने फौजदार परीक्षेचा अभ्यास सुरू केला व शेवटी त्यांच्या मेहनतीला व कष्टाला २०१६ मध्ये झालेल्या फौजदार परीक्षेत यश मिळाले. त्यांच्या या यशाबद्दल सर्वच स्तरांतून त्यांचे कौतुक केले जात आहे. जन्मभूमी सावरगाव (ता. मुळशी) या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.सुधीर साठे यांनी शंकरराव मोरे विद्यालय व कॉलेज पौड रोड एरंडवणा पुणे येथून बारावीपर्यंत शिक्षण घेतले. यशवंतराव मोहिते कॉलेज पुणे येथून वाणिज्य शाखेमधून पदवी प्राप्त केली आहे.