शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

पित्याने केला मुलीचा गळा दाबून खून

By admin | Updated: October 31, 2014 01:33 IST

मुर्तिजापूर तालुक्यातील घटना, एक महिन्याच्या बालिकेला मारून विहिरीत फेकले.

मूर्तिजापूर (अकोला) : दोन मुलीच्या पाठीवर पत्नीने पुन्हा तिसर्‍या मुलीस जन्म दिल्याने संतापलेल्या पित्याने क्रौर्याची परिसीमा गाठत, एक महिन्याच्या कोवळ्या बालिकेचा गळा आवळून निर्घृण खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह या क्रूरकर्माने गावातील विहिरीत फेकून दिला. मूर्तिजापूर तालुक्यातील बोर्टा गावात गुरूवारी ही घटना उघडकीस आली.माना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्टा येथील रहिवासी कैलाश आप्पाराव बुंधोट (४0) हा गावात शेती करीत असून, टी.व्ही., फ्रीज आदी दुरुस्त करण्याचे कामही तो करतो. त्याला दोन मुली आहेत. एक महिन्यापूर्वी त्याच्या पत्नीने तिसर्‍या मुलीस जन्म दिला. दोन मुलीच्या पाठोपाठ तिसरी मुलगीच झाल्याने त्याने दारू पिणे सुरू केले. २८ ऑक्टोबर रोजी कैलाशने दारूच्या नशेत पत्नीशी भांडण केले. त्याने पत्नीला ११ व १३ वर्षे वयाच्या दोन मुलींसह घराबाहेर काढून दिले; मात्र एक महिन्याच्या मुलीस त्याने स्वत: जवळ ठेवून, घराचे दार आतून बंद करून घेतले. त्यानंतर त्याने या निष्पाप बालिकेचा गळा दाबून खून केला. नंतर तिचा मृतदेह कपड्यामध्ये गुंडाळून, तो गावातील नागोबा मंदिरानजीकच्या विहिरीत फेकला. पित्याच्या या निर्दयी कृत्यामुळे २९ ऑक्टोबर रोजी कैलाशची पत्नी वर्षा हिने माना पोलिस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दिली. तपासात एक महिन्याच्या बालिकेचा कपड्यात गुंडाळलेला मृतदेह पोलिसांना आढळला. घटनेचा उलगडा झाल्यानंतर पित्याच्या निर्दयतेचा उलगडा झाला. याप्रकरणी माना पोलिसांनी आरोपी कैलाश बुंधोटविरुद्ध भादंविचे कलम ३0२ , २0१ अन्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. बालिकेचा मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविला आहे.