शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

बाप रे... १२३ कोटींची एफआरपी थकीत!

By admin | Updated: October 22, 2016 01:47 IST

अगामी ऊस गाळप हंगाम सुरू होण्यास जेमतेम दोन आठवड्यांचा कालावधी शिल्लक असताना, गेल्या वर्षीच्या हंगामातील २० साखर कारखान्यांनी तब्बल १२३ कोटी रुपये ऊस

पुणे : अगामी ऊस गाळप हंगाम सुरू होण्यास जेमतेम दोन आठवड्यांचा कालावधी शिल्लक असताना, गेल्या वर्षीच्या हंगामातील २० साखर कारखान्यांनी तब्बल १२३ कोटी रुपये ऊस उत्पादकांना अजूनही दिलेले नाहीत. तर गेल्या दोन हंगामांत ३६ कारखान्यांनी सुमारे २२८ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले नसल्याने त्यांच्यावर साखर आयुक्तालयाने कारवाई केली आहे. आगामी ऊस गाळप हंगाम ५ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर एफआरपी न दिलेल्या साखर कारखान्यांकडून वसुलीसाठी साखर आयुक्तालयाकडून तगादा सुरू आहे. गेल्या हंगामात १७७ खासगी व सहकारी साखर कारखान्यांनी ऊस गाळप केले होते. त्यातून तब्बल ७४२.९४ लाख टन उसाचे गाळप झाले होते. त्यापोटी साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना किफायतशीर व रास्त दरापोटी (एफआरपी) १६ हजार ४७२ कोटी रुपये देणे अपेक्षित होते. परंतु १६ हजार ३८३ कोटी रुपयेच शेतकऱ्यांना मिळाले आहेत. अजूनही २० साखर कारखान्यांकडे १२३ कोटी रुपये शिल्लक आहेत. गेल्या हंगामातील १३ कारखान्यांनावर एफआरपीची रक्कम न दिल्याने रेव्हेन्यू अ‍ॅण्ड रिकव्हरी सर्टिफिकेटची (आरआरसी) कारवाई करण्यात आली होती. त्यांच्याकडे तब्बल १६५ कोटी रुपयांची थकबाकी होती. त्यातील ९५ कोटी रुपयांची वसुली झाली असून, ७० कोटी रुपये शिल्लक आहेत. त्याचबरोबर २०१४-१५मधील २३ साखर कारखान्यांकडे ३१३ कोटी रुपये थकीत असल्याने, त्यांच्यावरही आरआरसीची कारवाई करण्यात आली होती. त्यातील १५४ कोटी रुपये वसूल करण्यात साखर आयुक्तालयाला यश आले आहे. मात्र, अजूनही १५८ कोटी रुपयांची थकबाकी त्यांच्याकडे आहे. संबंधित कारखाना क्षेत्रातील जिल्हाधिकाऱ्यांमार्फत थकबाकी वसुलीची पुढील कारवाई करण्यात येत असल्याचे साखर आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मागील हंगामात निर्यात अनुदानापोटी केंद्र सरकारकडून ४५ रुपये प्रति टन या प्रमाणे रक्कम मिळणार होती. त्या रकमेसाठी अनेक कारखान्यांनी एफआरपीची रक्कम थांबविली होती. परंतु, या कारखान्यांनी दिवाळीपूर्वीच थकीत रक्कम देण्याची तयारी दर्शविल्याची माहिती सूत्रांनी दिली.