शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
2
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
3
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
4
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
5
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
6
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
7
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
8
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
9
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
10
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
11
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
12
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
13
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
14
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
15
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
16
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
17
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
18
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
19
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

दोनदमध्ये आढळली घातक ‘सँडफ्लाय’

By admin | Updated: September 20, 2014 01:06 IST

डेंग्यूचे डासही आढळले, आरोग्य पथकाकडून पाहणी, औषधांचा केला पुरवठा.

सचिन राऊत / अकोलाबाश्रीटाकळी तालुक्यातील दोनद बु. हे नदीकाठावरील अख्खं गाव तापाच्या साथीने फणफणत असून, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय आरोग्य पथकाने गावात गुरुवारी सायंकाळी तपासणी केली. तपासणीमध्ये चंडीपुरा तापाचा थैमान घालणारी घातक सँडफ्लाय माशी आढळली असून, डेंगूयचे डासही आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागही हादरला असून, त्यांनी गावात औषधांचा पुरवठा सुरू केला आहे.दोनद बु. ११५0 लोकसंख्या असलेले गाव. काटेपूर्णा नदीच्या तिरावर २५0 कुटुंब असून, त्यांना प्रशासनाकडून अद्याप परिपूर्ण मूलभूत सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे गत तीन आठवड्यापासून गावात तापाच्या साथीने थैमान घातले असून, जलजन्य व कीटकजन्य आजारांनी ग्रामस्थ हैरान झाले आहेत. टायफाईड व व्हायरल तापाच्या साथीने गावातील एका चिमुकल्याचा बळी गेल्यानंतरही जीवघेण्या समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे ह्यलोकमतह्णने उघडकीस आणल्यानंतर आरोग्य विभागाच्या जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पथकाने गावात तपासणी केली. यामध्ये त्यांना सँडफ्लाय माशी व डेंग्यूचे डास आढळले आहेत. यामधील सँडफ्लाय माशी ही चंडीपुरा नावाचा तापाचा उद्रेक करणारी असून, त्यामुळे रुग्ण दगावण्याची भीती आहे. गावातील नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असून, हातपंपानजीक असलेल्या खतामधील घाणीमुळेही साथीचे आजार वाढले असल्याची शक्यता असल्याने ही तपासणी करण्यात आली. मात्र, या तपासणीत घातक असलेली सँडफ्लाय माशी व डेंग्यूचे डास आढळल्याने आरोग्य विभागही हादरला आहे. या गावातील नागरिक गत तीन आठवड्यापासून टायफाईड व व्हायरल तापाचा सामना करीत असून, सवरेपचार रुग्णालयामध्ये ३0 च्यावर रुग्णांवर ८ सप्टेंबरपासून उपचार सुरू आहेत. या तापाच्या उद्रेकाचा आजूबाजूच्या गावांना धोका असल्याने आरोग्य विभागाने तातडीने उ पाययोजना सुरू केल्या आहेत. सँडफ्लायमुळे चंडीपुरा नावाच्या आजाराचा उद्रेक होतो. नागपूर आणि चंद्रपूर परिसरामध्ये ही माशी आढळते आणि याच भागातून ही माशी जिल्हय़ात आल्याची शक्यता आहे. ज्या गावामध्ये ही माशी आढळली त्या ठिकाणी आवश्यक तो औषध पुरवठा करण्यात आला असून, तापाच्या साथीला नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आशिष भारती यांनी सांगीतले.