शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
4
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
5
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
6
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
7
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
8
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
10
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
11
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
12
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
13
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
14
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
15
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
16
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
17
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
18
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
19
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
20
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला

'एमपी'च्या केळीवर वऱ्हाडातील भाविकांचा उपवास

By admin | Updated: August 21, 2016 19:02 IST

श्रावण मासातील वेगवेगळ्या उपवासात सर्वांनाच केळीची आठवण होते. परंतू, गेल्या तीन वर्षापासून जिल्ह्यातून केळीचे घडच हद्दपार झाल्याने जिल्ह्यात मध्यप्रदेशातून केळीची आवक होत आहे.

ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा, दि. २१ : श्रावण मासातील वेगवेगळ्या उपवासात सर्वांनाच केळीची आठवण होते. परंतू, गेल्या तीन वर्षापासून जिल्ह्यातून केळीचे घडच हद्दपार झाल्याने जिल्ह्यात मध्यप्रदेशातून केळीची आवक होत आहे. जिल्ह्यात केळीचे उत्पादन घटल्याने पश्चिम वऱ्हाडातील भाविकांच्या उपवासासाठी एमपीची केळी येत आहे. राज्यातील पीक पेरणीच्या क्षेत्रापैकी सरासरी ४४ हेक्टर क्षेत्र केळीच्या लागवडीखाली आहे. त्यापैकी केळी लागवडीचे ५० टक्के क्षेत्र हे जळगाव जिल्ह्यातील आहे. त्यामुळे जळगांव जिल्ह्याला केळीचे आगार मानले जाते. मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील बसमत तालुका केळी उत्पादनात अग्रेसर आहे. तसेच बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुका व चिखली तालुक्यातील मेरा चौकीची केळी देखिल प्रसिद्ध आहेत.

मात्र उर्वरीत विदर्भातील शेतकऱ्यांनी सुद्धा आधुनिक शेतीची कास धरत केळी लागवड करण्यास सुरूवात केली होती. जळगाव जिल्ह्यापाठोपाठ विदर्भातील शेतीतही केळीचे फड गत काही वर्षांपासून दिसत होते. बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा फळबाग लागवण्याकडे कल वाढला असतांना, त्यात वाढत्या मागणीमुळे केळीचे प्रमाण सर्वाधिक होते. मात्र जिल्ह्यात गेल्या तीन वर्षापासून निसर्गाच्या अवकृपेमुळे केळीचे उत्पादन घटले आहे.

हवामानाचा परिणाम केळीच्या वाढीवर व फळे पक्व होण्यास होत  असतो. तसेच केळी पिकाला इतर फळपिकांच्या तुलनेत जास्त पाण्याची गरज असते. त्यामुळे दिवसेंदिवस कमी होत असलेल्या पर्जन्यमानाचा व खोलवर जात असलेल्या पाणी पातळीचा केळी बागांवर परिणाम होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात केळीची फड दिसेनासे झाले आहेत. श्रावण मासात येणाऱ्या वेगवेगळ्या उपवासात केळीची मागणी वाढली आहे. परंतू, जिल्ह्यात केळीचे उत्पादन होत नसल्याने मध्यप्रदेशमधील बऱ्हाणपूर तसेच जळगाव खांदेश येथून केळीची पश्चिम वऱ्हाडातील बुलडाणा, अकोला, वाशिम या तीन्ही जिल्ह्यात आवक होत आहे. त्यामुळे वऱ्हाडातील भाविकांना आपल्या उपासासाठी मध्यप्रदेशची केळी घ्यावी लागत आहेत. बॉक्स........राज्यातील केळीचे उत्पादन दोन वर्षात घसरलेराज्यात केळी लागवड क्षेत्रामध्ये सन २०१४ पर्यंत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. राज्यात सन २००४-०५ मध्ये ६२ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड करण्यात आली होती. त्यामध्ये ४ हजार २०० टन उत्पादन घेण्यात आले होते. त्यानंतर सन २००९-१० मध्ये ७२ हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड होऊन ४ हजार ३०० टन उत्पादन घेण्यात आले होते. सन २०१०-११ मध्ये ७९ हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड करण्यात आली, त्यामध्ये ४ हजार ५०० टन उत्पादन झाले. सन २०१२-१३ मध्ये ८० हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड करण्यात आली, त्यामध्ये ४ हजार ६०० टन उत्पादन झाले. तर सन २०१३-१४ मध्ये ८५ हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड करण्यात आली, त्यामध्ये ५ हजार २०० टन उत्पादन झाले. २०१४ पर्यंत केळी उत्पादन सुमारे ५ हजार २०० टनच्यावर पोहचले; मात्र २०१५-१६ मध्ये अत्यल्प पावसाचा फटका बसून गेल्या दोन वर्षात राज्यातील  ४० टक्के केळी उत्पादनाला फटका बसला आहे. बॉक्स.........केळीचे उत्पादन घटण्याची कारणे1.केळीचे एक पीक घेण्यास ४५ ते ७० पाण्याच्या पाण्या लागतात.2.केळी उष्ण व कटीबंदीय फळ असून त्यास उष्ण व दमट हवामान मानवते.3.काळी कसदार जमीन व पाणी पुरवठ्याची चांगली सोय आवश्यक.4.तापमान ६० सेंटीग्रेटपेक्षा कमी असल्यास  केळीची पाने पिवळी पडतात.5.क्षारयुक्त जमीनी केळी लागवडीस उपयुक्त नाहीत.6.केळीवरील रोगावर नियंत्रण मिळविण्यास शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचा अभाव.