शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
4
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
5
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
6
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
7
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
8
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
9
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
10
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
11
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
12
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
13
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
14
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
15
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
16
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
17
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
19
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
20
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...

शेतकऱ्यांच्या आत्महत्या नक्कीच थांबतील

By admin | Updated: September 11, 2016 03:49 IST

पतंजली फूड आणि हर्बल पार्कमुळे शेतकऱ्यांना कृषी मालासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. मध्यस्थांद्वारे लुबाडणूक न होता, त्यांच्या कृषिमालाला चांगली किंमत मिळेल.

नागपूर : पतंजली फूड आणि हर्बल पार्कमुळे शेतकऱ्यांना कृषी मालासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. मध्यस्थांद्वारे लुबाडणूक न होता, त्यांच्या कृषिमालाला चांगली किंमत मिळेल. त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊन तो आत्महत्या करणार नाही, अशी ग्वाही महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.मिहानमधील पतंजली फूड व हर्बल पार्कचे भूमिपूजन शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, योगगुरू बाबा रामदेव, आचार्य बालकृष्ण, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, रामदास तडस, डॉ. विकास महात्मे, अजय संचेती, महापौर प्रवीण दटके उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, ‘जगातील सर्वात मोठा फूड पार्क मिहानमध्ये साकार होणार आहे. या पार्कमध्ये कृषिमालावर आधारित प्रक्रिया उद्योग असल्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती सुधारणार आहे. उसाप्रमाणेच विदर्भात मध्यस्थांची साखळी बंद होऊन शेतकऱ्यांच्या कृषिमालाला चांगली किंमत मिळेल. या पार्कच्या माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या ५० हजार रोजगारनिर्मिती होणार आहे. पतंजलीने शेतीचे क्लस्टर उभारावे,’ अशी मागणी त्यांनी केली.विदर्भात ७५ टक्के जंगल आहे. या जंगलातील आदिवासींतर्फे उत्पादित वस्तू आणि अमरावती मेळघाट येथील जडीबुटी पतंजली खरेदी करणार आहे. विदर्भात शेतीपूरक रोजगार नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहे. या उद्योगामुळे गावातील युवकांना रोजगार मिळेल, असे गडकरी म्हणाले. (प्रतिनिधी)तब्बल ५०० कोटींचा कृषी माल खरेदी करणारविदर्भातील शेतकऱ्यांकडून १०० कोटींचा नव्हे, तर तब्बल ५०० कोटींचा कृषिमाल पतंजली खरेदी करणार आहे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा पाच हजार कोटी रुपयांचा माल खरेदी करण्याचे आश्वासन बाबा रामदेव यांनी दिले. त्यामुळे विदर्भ आणि महाराष्ट्रात ‘अच्छे दिन येतील’ असे त्यांनी स्पष्ट केले.क्लस्टर शेतीबाबत मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर रामदेव म्हणाले, महाराष्ट्रात पाच हजार एकर पडीक जमिनीवर क्लस्टर तयार करून आवळा, कोरफड आणि अन्य आयुर्वेदिक वनस्पतींचे पीक घेणार आहे. शेतकऱ्यांना २टक्के व्याजाने पैसा मिळेल. त्यांचा माल पतंजली खरेदी करण्यासह त्यांचे कर्जही परतफेडीच्या स्वरूपात पतंजलीतर्फे चुकते केले जाईल. नियमांचे पालन करून जमीनसरकारने बाबा रामदेव यांच्या फूड पार्कला नियमांचे पालन करून जमीन दिल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. यासाठी सचिव स्तराच्या चार सदस्यांची समिती नेमली होती. २३० एकर जागेसाठी निविदा काढली, तेव्हा फक्त पतंजलीने निविदा भरली होती. दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा काढली, तेव्हासुद्धा एकमेव पतंजलीने निविदा भरली होती. एकच गुंतवणूकदार पुढे आल्याने, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) तिसऱ्यांदा निविदा काढली. त्या वेळी पतंजलीव्यतिरिक्त कुणीही निविदा भरली नाही. त्यामुळे केंद्रीय दक्षतेच्या नियमानुसार पतंजलीला जागा देण्यात आली. कंपनीने जमिनीची किंमत निर्धारित रकमेपक्षा जास्त दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.