शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी अडवला मंत्र्यांचा ताफा!

By admin | Updated: August 29, 2015 02:32 IST

दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी थेट केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांच्या वाहनांचा ताफा अडवला.

शिर्डी (जि.अहमदनगर) : दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी थेट केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांच्या वाहनांचा ताफा अडवला. त्यामुळे प्रशासनाचे अधिकारीही काही काळ गोंधळले होते. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या़ अशोक गजपती राजू यांनी शुक्रवारी सकाळी साईदर्शनानंतर जिल्हाधिकारी अनिल कवडे, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी बगाटे, प्रांताधिकारी कुंदन सोनवणे आदींसह शिर्डी विमानतळाची पाहणी केली़ त्यानंतर ते परतत असताना कोऱ्हाळे गावातील शेतकरी अचानक ताफ्याला आडवे आले़ ते पाहून राजू वाहनातून खाली उतरले व शेतकऱ्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या़पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांना चारा नाही, याकडे सरकार लक्ष देत नाही, अशा तक्रारी त्यांनी मांडल्या़ शेतकरी मराठीत व्यथा मांडत होते. (प्रतिनिधी)साईसमाधी शताब्दीपूर्वीशिर्डी विमानतळ कार्यान्वितशिर्डी विमानतळाला निधीची कमतरता नाही. हे विमानतळ साईसमाधी शताब्दीपूर्वी कार्यान्वित होईल, असे केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी शुक्रवारी स्पष्ट केले आहे. आठवडाभरात येथील अडचणी व त्यावरील उपाययोजनांचा अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले.अशोक गजपती राजू यांनी शिर्डी विमानतळाची पाहणी केली़ या वेळी जिल्हाधिकारी अनिल कवडे, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी के़ एच़ बगाटे, प्रांताधिकारी कुंदन सोनवणे, अभियंता राजकुमार बेरी, तहसीलदार सुभाष दळवी त्यांच्यासोबत होते. संस्थानच्या सभागृहात त्यांनी अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेतला. व्यथा पोहोचविणारशेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार पीक विमा योजनेपासून अनेक योजना आणत आहे. पावसाने पाठ फिरवल्याने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची व्यथा केंद्र सरकारपर्यंत पोहोचवली जाणार असल्याचे हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी सांगितले.मंत्री महोदयांना हिंदी व इंग्रजीव्यतिरिक्त अन्य भाषा समजत नसल्याने संवादात अडथळा निर्माण झाला़ तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी हा विषय आपल्या अखत्यारीतील असल्याचे सांगत राजू यांना शेतकऱ्यांची व्यथा कथन केली.