शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी दुबार पेरणीच्या चक्रव्यूहात!

By admin | Updated: August 13, 2014 00:54 IST

अगोदरच दीड महिना उशिरा आलेला पाऊस शेतकऱ्याशी अक्षरश: लपंडाव खेळत आहे. गत काही दिवसांपासून पावसाने पुन्हा दडी मारली. यामुळे बळीराजा चांगलाच अडचणीत सापडला आहे.

पावसाने पुन्हा दडी मारली : कृषी विभागाकडे शेकडो तक्रारीनागपूर : अगोदरच दीड महिना उशिरा आलेला पाऊस शेतकऱ्याशी अक्षरश: लपंडाव खेळत आहे. गत काही दिवसांपासून पावसाने पुन्हा दडी मारली. यामुळे बळीराजा चांगलाच अडचणीत सापडला आहे. यापूर्वीच पावसाच्या खंडामुळे अनेकांना दुबार व तिबार पेरणी करावी लागली आहे. त्यामुळे अगोदरच त्याला आर्थिक फटका बसला आहे. अजूनपर्यंत कृषी विभागाकडे दुबार व तिबार पेरणीची अधिकृत आकडेवारी प्राप्त झालेली नसली, तरी संपूर्ण विभागात साधारण २५ ते ३० टक्के दुबार पेरणी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच १० ते १५ टक्क्यांपर्यंत तिबार पेरणी झाली आहे. यासंबंधी विभागीय कृषी उपसंचालक अजय राऊत यांना विचारणा केली असता, त्यांनी सर्व जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयांकडून आकडेवारी मागविली असून, अजूनपर्यंत ती प्राप्त झाली नसल्याचे ते म्हणाले. विदर्भात दरवर्षी साधारण जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस पडतो. मात्र यंदा तो जुलै महिन्याच्या शेवटी आला. त्यामुळे पेरणीला तब्बल दीड महिना विलंब झाला. दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी पहिल्याच पावसावर सोयाबीन व कापसाची पेरणी आटोपली. परंतु दोनच दिवसांत पुन्हा पाऊस गायब झाला. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे बियाणे जमिनीत पचले. १५ दिवसांच्या उसंतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. शेतकरी पुन्हा उत्साहित झाला. तडजोड करून, पुन्हा बी-बियाणे व खतांची खरेदी करून, दुबार पेरणी केली. यावेळी साधारण आठवडाभर पाऊस सुरू राहिला. त्यामुळे पिकांची उगवण सुरू झाली. शेतकरीही आनंदीत झाला. परंतु त्याचा हा आनंद काहीच दिवस टिकला. ऐन शेत अंकुरत असताना पाऊस पुन्हा गायब झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे माळरान हिरवे होण्यापूर्वीच पुन्हा काळे झाले. यामुळे शेतकरी चांगलाच खचला. काहींनी हिंमत करून, तिसऱ्यांदा पेरणी केली. परंतु अनेकांना ते शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांची शेती पडित राहिली. आता गत १५ दिवसांपासून पुन्हा पावसाने दडी मारली आहे. शेतातील हिरवेगार पीक कोमेजू लागले आहे. कृषी अधिकाऱ्यांच्या मते, यंदा पेरणीला साधारण दीड महिन्यांचा विलंब झाला आहे. याचा थेट उत्पादनावर परिणाम होणार आहे. सोयाबीनचे पीक पेरणीपासून साधारण १०० ते १०५ दिवसांत कापणीला येते. त्यानुसार जून महिन्यात पेरणी झालेले पीक सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या हाती येते. मात्र यंदा पेरणीच १५ जुलैपासून सुरू झाली आहे. त्यामुळे कापणीचा कालावधी लांबणार आहे. दुसरीकडे त्या पिकाला हवामानातील बदलाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)