शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी पाण्याअभावी अडचणीत

By admin | Updated: November 11, 2015 02:51 IST

खरिपाच्या आवर्तनापेक्षा जास्त पाणी सिंहस्थत गंगापूर धरणातून वापरण्यात आले. त्यातच आता जायकवाडी धरणात पाणी सोडल्याने आगामी काळात गंगापूर धरणातून शेतीसाठी पाणीच मिळणार नसल्याने शेकडो एकर शेती

नाशिक : खरिपाच्या आवर्तनापेक्षा जास्त पाणी सिंहस्थत गंगापूर धरणातून वापरण्यात आले. त्यातच आता जायकवाडी धरणात पाणी सोडल्याने आगामी काळात गंगापूर धरणातून शेतीसाठी पाणीच मिळणार नसल्याने शेकडो एकर शेती उद््ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याचा दावा जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी केला आहे.जलचिंतन संस्थेमार्फतच जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ती याचिका फेटाळल्यानंतर नुकतेच गंगापूर धरणातून १.३६ टीएमसी व दारणा धरणातून ३.२४ टीएमसी पाणी सोडण्यात आले. त्याबाबत महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणातील अधिकाऱ्यांविरोधात नुकतेच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आरोप केले होते.जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी सांगितले की, दारणा धरणातून तरी यापुढे शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सुटणार आहे. मात्र गंगापूर धरणातून शेतीसाठी एक थेंबही आता आवर्तन सुटणार नसल्याने या परिसरातील शेती उद््ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. गंगापूर धरण समूहात १७०.८० दलघमी पाण्याचा साठा असून, खरिपात ५४.५८ दलघमी पाणी वापरण्यात आले. २२५.३८ पाणीसाठा १५ आॅक्टोबर २०१५ पर्यंत उपलब्ध होता. त्यापैकी ३८.३८ दलघमी म्हणजेच १.३६ टीएमसी पाणी जायकवाडीसाठी सोडले, तर दारणात ३८६.८८ दलघमी पाणीसाठा उपयुक्त होता. महापालिकेच्या पाण्यात कपात करून शेतीला पाणी देणे आवश्यक आहे. नाही तर शेतकरी देशोधडीला लागणार असल्याचे राजेंद्र जाधव यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)