शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याने बँकेतच पेटवून घेतले

By admin | Updated: June 5, 2016 00:55 IST

वसुलीच्या तगाद्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने बँक व्यवस्थापकाच्या कक्षातच अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने पुढील प्रसंग टळला.

यवतमाळ : वसुलीच्या तगाद्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने बँक व्यवस्थापकाच्या कक्षातच अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने पुढील प्रसंग टळला. हा प्रकार शनिवारी दुपारी साडेबारा वाजता येथील वाशिम अर्बन बँकेच्या शाखेत घडला. अर्चित मानेकर असे या शेतकऱ्याचे नाव आहे. स्थानिक माळीपुरा भागातील गणपती मंदिर चौकातील रहिवासी असलेल्या अर्चित मानेकरची डोर्ली शिवारात शेती आहे. यावर त्याने तीन वर्षांपूर्वी वाशिम अर्बन बँकेच्या यवतमाळ शाखेतून दोन लाख रुपये कर्ज उचलले. या कर्जाची परतफेड तो करू शकला नाही. परिणामी, व्याजासह तीन लाख रुपये कर्ज झाले. या थकबाकीसाठी बँकेने अर्चितला नोटीस पाठविली. वारंवार पाठपुरावा करण्यात आला. या तगाद्यामुळे त्रस्त होऊन त्याने हा प्रकार केल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन शेतकऱ्यांची आत्महत्याबँकांकडून कर्जाच्या परतफेडीसाठी लावल्या जात असलेल्या तगाद्यामुळे जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. खुशाल बापूराव चव्हाण (३४ रा. कामठवाडा ता. यवतमाळ) आणि अर्जुन शामराव कराळ (रा. कापरा) अशी त्यांची नावे आहेत. कामठवाडा येथील खुशाल बापूराव चव्हाण या शेतकऱ्याला बँकेने कर्ज नाकारल्याने त्याने शुक्रवारी सकाळी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्याच्यामागे आई, पत्नी, मुलगा व मोठा आप्त परिवार आहे. अर्जुन कराळ याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. त्याच्याकडे चार एकर शेती आहे. त्या शेतीवर ग्रामीण बँकेच्या सावर शाखेचे ४० हजार रुपये कर्ज आहे. बँकेने पुनर्गठनास नकार दिल्यामुळे तो चिंतेत होता, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. (वार्ताहर)