शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

खारघरमधील शेतकऱ्याला ४७ वर्षांनंतर मिळाला न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2017 03:05 IST

सिडकोविरुद्ध प्रकल्पग्रस्त हा संघर्ष नवीन नाही. काही हजारोंचा मोबदला देऊन शेतकऱ्यांच्या जमिनी सिडको करोडो रुपयाने विकत आहे.

वैभव गायकर । लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : सिडकोविरुद्ध प्रकल्पग्रस्त हा संघर्ष नवीन नाही. काही हजारोंचा मोबदला देऊन शेतकऱ्यांच्या जमिनी सिडको करोडो रुपयाने विकत आहे. तर १०० टक्के जमिनी संपादित करून साडेबारा टक्केच्या आधारावर सिडकोने प्रकल्पग्रस्तांना देऊ केले. त्यातही रस्ते, उद्यानाच्या नावाखाली भूखंडवजा करण्यात आले. सिडकोविरोधात बंड पुकारून खारघरमधील मुर्बी गावातील भरत पाटील या शेतकऱ्याने तुटपुंजा मोबदला नाकारून हक्काची सर्व जमीन मला मिळाली पाहिजे, यासाठी उच्च न्यायालयातच याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायालयाने अंतिम निर्णय घेत, संपूर्ण १५ गुंठे जमीन शेतकऱ्याला देण्याचे आदेश दिल्याने सुमारे ४७ वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला यश आले आहे.१९७० साली सिडकोने नवी मुंबई प्रकल्पाकरिता जमिनी संपादित करण्यास सुरु वात केली. सुमारे १५ ते २० हजारांच्या दराने ठाणे, नवी मुंबईमधील ९५ गावांच्या जमिनी सिडकोने संपादित केल्या. त्यांनतर संपादित जमिनीपैकी केवळ साडेबारा टक्केच्या आधारावर भूखंड प्रकल्पग्रस्तांना देण्यात आले. मात्र, १ जानेवारी २०१४च्या भूसंपादन कायद्याच्या नव्याने केलेल्या तरतुदीनुसार ज्या शेतकऱ्याने संपादित जमिनीचा मोबदला स्वीकारला नसेल, अशा शेतकऱ्यांना संपूर्ण जमीन परत देण्याची तरतूद असल्याने या कायद्याच्या आधारावरच अ‍ॅडव्होकेट राहुल ठाकूर यांनी उच्च न्यायालयात भरत पाटील यांची बाजू जनहित याचिकेच्या मार्फत मांडून, सिडको विरोधात यशस्वी लढा दिला. मंगळवार, २७ जून रोजी न्यायमूर्ती एन. एम. जमादार यांनी शेतकऱ्याला संपूर्ण जमीन देण्याचे आदेश दिले.पनवेल तालुक्यातील ही पहिलीच याचिका आहे की, सिडको विरोधात लढा देऊन शेतकऱ्याने १०० टक्के जमीन परत मिळविली आहे. नवी मुंबईत प्रकल्पग्रस्तांच्या अनेक समस्या आहेत. त्यामध्ये गरजेपोटी घरे, गावठाण विस्तार, तसेच सामाजिक सुविधा प्रकल्पग्रस्तांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने येथील आगरी कोळी युथ फाउंडेशन सिडकोविरोधात लढत आहे.