शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

मनमानीमुळे शेतकरी हैराण

By admin | Updated: September 10, 2016 01:21 IST

उरळगाव हे शिरूर तालुक्यातील महत्त्वाचे गाव म्हणून ओळखले जाते.

पुणे : उरळगाव हे शिरूर तालुक्यातील महत्त्वाचे गाव म्हणून ओळखले जाते. गावात विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असूनही एका गावकामगार तलाठ्याने नागरिकांच्या नाकी नऊ आणले आहेत.उरळगावचे कामगार तलाठी के. एम. जाधव यांच्या मनमानी व हम करे सो कायदा यानुसार गावकऱ्यांना हेलपाटे आता नित्याचेच झाले आहे. या कामगार तलाठ्याला उरळगाव हा सज्जा मंगळवार, गुरुवार दिलेला आहे. या दिवशी तर हजर होत नाहीत; उलट नागरिकांचे मृत्यू नोंद, खरेदी खत नोंद ही प्रामुख्याने ‘शिरूर, न्हावरे येथे या; तुमचे काम होईल’ सांगतात. नागरिक कामधंद्या सोडून सांगितलेल्या ठिकाणी दिवसभर वाट पाहत बसतात. संध्याकाळ होईपर्यंत ते येत नाहीत हे कळाल्यावर ‘वाट’ पाहणाऱ्या नागरिकांना नाइलाजाने घरची ‘वाट’ धरावी लागते.सातत्याने हेलपाटे मारूनही काम होत नसल्याने शेवटी फोन केला असता, ‘मीटिंग होती, आलो नाही. काम नंतर करू. माझे कोण वाकडे करू शकणार नाही, कोणालाही सांगा’ अशी उद्धट आणि अरेरावीची उत्तरे शतेकऱ्यांना ऐकावी लागत आहेत. (वार्ताहर)>तक्रारींना केराची टोपली : माझं कुणी काहीही करू शकत नाही याबाबतची तक्रार शिरूर तहसीलदार, प्रांत अधिकारी यांना दिलेले आहे. मात्र, काहीही कारवाई होत नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांनी सोसायटी मंजूर करण्यासाठी ७/१२ वर ऊसपीक लावण्यासाठी चेअरमनकडे जावे लागत आहे. त्यांनी भाऊसाहेबांना फोन लावला, तर ‘मी मीटिंगमध्ये आहे,’ असे सांगतात. पंरतु, भाऊसाहेब हे न्हावरे गावात फिरताना दिसतात, असे शेतकऱ्यांनी सांगितले. भाऊसाहेबांचा भाऊसाहेब कोण?प्रांत अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊनही येथील भाऊसाहेबांवर काहीच कारवाई होत नसल्याने भाऊसाहेबांचा भाऊसाहेब कोण? असा प्रश्र आता येथील शेतकऱ्यांना पडला आहे.