शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसनासाठी शेतजमीन

By admin | Updated: December 28, 2016 01:16 IST

राष्ट्रीय व राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी भूसंपादन करताना प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाकडील जमिनीवर करण्यासाठी महाराष्ट्र शेतजमीन

मुंबई : राष्ट्रीय व राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी भूसंपादन करताना प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाकडील जमिनीवर करण्यासाठी महाराष्ट्र शेतजमीन अधिनियमात सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. भूसंपादनाला खासगी जमीनधारकांचा विरोध अनेक ठिकाणी होतो आणि त्यातून प्रकल्पांना विलंब होतो. तो टाळण्यासाठी तसेच प्रकल्पग्रस्तांचेही समाधान करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. सध्या या महामंडळाकडे ६८ हजार ८२६ एकर शेतजमीन आहे. त्यापैकी २६ हजार ५०९ एकर क्षेत्र हे माजी खंडकऱ्यांना वाटपासाठी प्रस्तावित आहे. ४२ हजार ३१६ एकर क्षेत्र महामंडळाकडे शिल्लक राहते. ती अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यामध्ये आहे. (विशेष प्रतिनिधी)आठवले सूतगिरणीला अर्थसहाय्यदिग्रस (जि. यवतमाळ) येथील रामदास आठवले मागासवर्गीय कापूस उत्पादक शेतकरी सहकारी सूतिगरणीला बाराव्या पंचवार्षिक योजनेमधून अर्थसहाय्य करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. या आधी सदर सुतगिरणीचे नाव सिद्धेश्वर सहकारी सुतिगरणीच्या नावात बदल करून या गिरणीचे नाव रामदास आठवले मागासवर्गीय कापूस उत्पादक शेतकरी सहकारी सूतिगरणी असे करण्यात आले आहे. सहकारी सूतिगरण्यांच्या नोंदणीस मान्यता देण्यासंदर्भात सुधारित धोरण ठरविण्यासाठी वस्रोद्योग मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. रमाई व शबरी घरकूल योजनेच्या अनुदानात वाढ राज्यातील ग्रामीण भागातील अनुसुचित जाती व नवबौध्द कुटुंबांना हक्काचे घर मिळावे यासाठी रमाई आवास योजना तसेच अनुसूचित जमातीतील कुटुंबांसाठी शबरी आवास योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार साधारण क्षेत्रासाठी रु पये १ लाख ३२ हजार रुपये व नक्षलग्रस्त व डोंगराळ भागासाठी रु पये १ लाख ४२ हजार याप्रमाणे प्रति घरकूल अनुदान देण्यात येणार आहे.याशिवाय प्रधानमंत्री आवास योजनेमधील (ग्रामीण) लाभार्थ्यांना मनरेगा अभियानांतर्गत देण्यात येत असलेले अनुदान रमाई आवास योजना (ग्रामीण) व शबरी आवास योजना (ग्रामीण) यांनाही लागू असेल. या अनुदानांतर्गत साधारण क्षेत्रातील कुटुंबांना १७ हजार २८० तर नक्षलग्रस्त व डोंगराळ क्षेत्रासाठी रु पये १८ हजार २४० एवढे अनुदान उपलब्ध करु न देण्यात येईल.प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) याप्रमाणे बदल करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रु.पर्यंत असावे. घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्यांना अडीच लाखरु पये एवढे अनुदान देण्यात येईल.नागपूर सुधार प्रन्यास बरखास्तनागपूरच्या विकासासाठी ८० वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या नागपूर सुधार प्रन्यासच्या (एनआयटी) बरखास्तीचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. एनआयटीचे अस्तित्व नागपूरसाठी आवश्यक आहे की नाही हा गेली अनेक वर्षे नागपुरात वादाचा विषय होता. एनआयटीने नागपूरच्या सुनियोजितविकासासाठी नेमके काय योगदान दिले असेही विचारले जात होते. नागपूर शहर आणि सभोवतालच्या महानगर क्षेत्राच्या विकासासाठी नागपूर महानगर प्रदेश क्षेत्र प्राधिकरण अस्तित्वात आहे. त्याच्या कितीतरी आधीपासून नागपूर महापालिका अस्तित्वात आहे. त्यामुळे आता एनआयटीची आवश्यकता राहिलेली नाही. नागरिकांना त्यांची कामे करताना निर्माण होणारा संभ्रम टाळण्याच्या दृष्टीने एनआयटी बरखास्त करण्यात येत असल्याची भूमिका मंत्रिमंडळाने घेतली. २५ डिसेंबर १९३६ मध्ये एनआयटीची स्थापना करण्यात आली होती. नागपूर सुधार प्रन्यासकडील मत्ता आणि दायित्वांचे क्र मश: हस्तांतरण नागपूर महापालिका तसेच नागपूर महानगर विकास प्राधिकरणाकडे एक वर्षाच्या कालावधीत करण्यात येईल. तसेच मत्ता आणि दायित्व कोणत्या प्राधिकरणास किती प्रमाणात असावे याबाबतचा निर्णय घेण्यासाठी नगरविकास विभागाचे सचिव, नागपूर महानगर पालिका आयुक्त आणि नागपूरसुधार प्रन्यासचे सभापती यांची समिती शासनाने नेमली आहे. ही समिती त्या बाबत शासनास शिफारस करेल.