शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

फॅन्सी कंठीचा बोलबाला

By admin | Updated: September 5, 2016 02:40 IST

गणपतीच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी भक्तांची ज्वेलरीच्या दुकानांमध्ये गर्दी उसळली आहे.

प्रज्ञा म्हात्रे,

ठाणे- गणपतीच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी भक्तांची ज्वेलरीच्या दुकानांमध्ये गर्दी उसळली आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला सजवण्यासाठी वेगवेगळे दागिने खरेदी करताना काय घेऊ अन् काय नको घेऊ, अशी त्यांची अवस्था झाली आहे. दागिन्यांमधील वैविध्य डोळे दिपवून टाकणारे असले तरी ‘फॅन्सी कंठी’चा सर्वाधिक बोलबाला आहे. केवळ चांदीचेच दागिने नाहीत, तर सोन्याचा मुलामा दिलेले अस्सल सोन्यासारखे दिसणारे दागिने उपलब्ध आहेत. गणेशमूर्तीच्या गळ्यात, हातात, पायात सोनेरी रंगाने रंगवलेले दागिने असतात. मात्र, बाप्पाला सजवण्याचा भक्तांमध्ये एक वेगळाच उत्साह असतो. त्यामुळे त्या दागिन्यांवर हे दागिने घातले जातात. सोनेचांदीच्या दागिन्यांबरोबर इमिटेशन ज्वेलरीमध्ये नवनवे प्रकार उपलब्ध आहेत. कंठीमध्ये मोदक कंठी, मोत्याची कंठी, श्रीमंत हार, फॅन्सी कंठी ६९९ ते चार हजार रुपयांपर्यंत आहे. बाप्पाच्या उपरण्यांमध्ये डायमंड, मोती आणि गोल्डन उपरणे असे तीन प्रकार असून ते ३९९ रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. मुकुटामध्ये यंदा नवीन प्रकार आले असून यात फेटा मुकुट, वेणी मुकुट, बालाजी मुकुट पाहायला मिळत आहे. ४९९ रुपयांपासून चार हजार रुपयांपर्यंत ते उपलब्ध आहेत. सोंडपट्टीमध्ये मण्यांची, झालर व डायमंड हे तीन प्रकार असून ते ४९९ रुपयांपासून १५०० रुपयांपर्यंत मिळत आहेत. मूषकराज यंदा काळ्या रंगामध्ये आला आहे. २९९ ते दोन हजार रुपयांपर्यंत त्याची किंमत आहे. भीकबाळी, कान, कमरपट्टा, छत्र, तोडे, कंगन, कुंडल, दूर्वाचा (पान १ वरुन)... हार, जास्वंदीचा हार, केळीचं पान, मोदकाची चळ, जानवे, बाजुबंद, लामणदिवा, पंचारती, पंचपात्र, उदबत्ती स्टॅण्ड, फुलपरडी, बाप्पाचं उपरणं, गोल्ड प्लेटेड मोदक कंठी, मोत्याची कंठी, खारीक, बदाम, जर्दाळू इत्यादी प्रकारांतला चांदीचा ड्रायफ्रूट सेट, गोल्ड प्लेटेड पाच फळं, परशू अशानानाविध प्रकारच्या दागिन्यांनी दुकाने सजली आहेत. गौरीच्या दागिन्यांनाही ग्राहकांचा प्रतिसादगौरीच्या पारंपरिक दागिन्यांना दरवर्षीप्रमाणे यंदाही चांगलीच मागणी असल्याचे सतीश गायकवाड यांनी सांगितले. यात श्रीमंतहार, राणीहार, चपलाहार, पुतळीहार, लक्ष्मीहार, मणी-मंगळसूत्र, ठुशी, हुडी, झुमके, कमरपट्टा, नथ, पाटली, तोडे, पिछोडी असे दागिन्यांचे प्रकार इमिटेशन ज्वेलरीमध्ये पाहायला मिळतात. हे २९९ रुपयांपासून ३००० रुपयांपर्यंत आहेत असे विक्रेत्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>सोनेचांदीच्या दागिन्यांपेक्षा इमिटेशन ज्वेलरीकडे ग्राहक जास्त वळू लागला आहे. कारण, हे दागिने सर्वसामान्यांना परवडतात. १९९ रुपयांपासून पुढे या दागिन्यांची किंमत आहे.- सतीश गायकवाड.