शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

मध्यस्थांच्या मदतीने सोडवा कौटुंबिक वाद

By admin | Updated: June 12, 2016 04:26 IST

सार्वजनिक ठिकाणी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून झाल्यानंतर अखेरीस टेनिसपटू लिएंडर पेस आणि रेहा पिल्लई त्यांच्यामधील वाद सामंजस्याने सोडविण्यास तयार झाले आहेत.

मुंबई : सार्वजनिक ठिकाणी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून झाल्यानंतर अखेरीस टेनिसपटू लिएंडर पेस आणि रेहा पिल्लई त्यांच्यामधील वाद सामंजस्याने सोडविण्यास तयार झाले आहेत. उच्च न्यायालयाने या दोघांनाही त्यांच्यातील वाद तज्ज्ञ मध्यस्थाच्या साहाय्याने सोडवण्याची सूचना केली.पती-पत्नीमधील दीर्घकालीन वादामुळे १० वर्षांच्या मुलीवर होणाऱ्या मानसिक परिणामाची जाणीव करून दिल्यावर लिएंडर व रेहा मध्यस्थाद्वारे वाद सोडवण्यास तयार झाले. रेहाने लिएंडरविरुद्ध घरगुती हिंसाचाराची केस केली आहे. या केसवरील सुनावणी न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठापुढे होती. लिएंडरने मुलीचा ताबा मिळवण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात केलेल्या अर्जानंतर रेहाने त्याच्याविरुद्ध घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत केस केली. तसेच दरमहा देखभालीचा खर्च म्हणून चार लाख रुपयांची मागणी केली. त्याशिवाय राहत्या घरातून काढण्यात येऊ नये, अशीही मागणी रेहाने केली आहे.‘रेहाने लिएंडरवर मानसिक, शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. मात्र तिने दावा केल्याप्रमाणे तिच्यावर कोणताही अत्याचार करण्यात आला नाही,’ असा युक्तिवाद लिएंडरच्या वतीने ज्येष्ठ वकील आबाद पौडा यांनी केला. आम्ही ‘लिव्ह-इन-रिलेशन’मध्ये होतो. मी तिला कधीच फ्लॅटमधून बाहेर जाण्यास सांगितले नाही. यापूर्वीही आम्ही हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या (रेहा) मागण्या वाढतच आहेत. त्यामुळे आम्ही कोणत्याही निष्कर्षावर पोहोचलो नाही, असे लिएंडरच्या वतीने पौडा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)आॅलिम्पिक स्पर्धा तोंडावर आॅलिम्पिक स्पर्धा तोंडावर आली आहे आणि त्यापूर्वी मला हा वाद सोडवायचा आहे, असा युक्तिवाद लिएंडरच्या वतीने अ‍ॅड. पौडा यांनी केला. दोन्ही पक्षांच्या वकिलांनी मध्यस्थाऐवजी खुद्द न्यायाधीशांनीच या दोघांशी चेंबरमध्ये बोलून वाद सोडवावा, अशी विनंती न्या. रेवती मोहिते - डेरे यांना केली. या दोघांशी चर्चा केल्यानंतर न्यायाधीशांनी या दोघांना २० जून रोजी चेंबरमध्ये उपस्थित राहण्यास सांगितले.