शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

पैशाच्या वसुलीसाठी कुटुंबीयांना मारहाण

By admin | Updated: May 21, 2016 01:06 IST

जाधववाडी येथे घरात घुसून महिलेसह तिच्या पती व मुलाला एकाने लाकूड, दगडाने बेदम मारहाण केली.

इंदापूर : व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी गुरुवारी (दि.१९) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सरडेवाडी (ता. इंदापूर) नजीकच्या जाधववाडी येथे घरात घुसून महिलेसह तिच्या पती व मुलाला एकाने लाकूड, दगडाने बेदम मारहाण केली. मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली आहे. इंदापूर पोलिसांनी आरोपीला रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे. परशुराम शंकर जमदाडे (रा.जमदाडेवस्ती, सरडेवाडी) असे आरोपीचे नाव आहे. जमरुद हैदर शेख (वय ४०,रा. जाधववस्ती, सरडेवाडी) या महिलेने त्याविरुध्द तक्रार दिली आहे. हे सावकारीचे प्रकरण असताना देखील पोलिसांनी नोंदीमध्ये त्याचा उल्लेख केलेला नाही. सविस्तर हकीकत अशी की, जमरुद शेखचा नवरा हैदर दगडू शेख याने दोन वर्षांपूर्वी आरोपीकडून व्याजाने एक लाख रुपये घेतले होते. आपली शहा पाटीजवळची आठ गुंठे जमीन विकून आलेल्या पैशातून व वेळोवेळी व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातून आत्तापर्यंत त्याने आरोपीस पाच ते सहा लाख रुपये दिलेले आहेत. तरीही अजून तेरा हजार रुपये द्यावेत म्हणून आरोपी शेख कुटुंबीयांना घरी जाऊन धमकावत होता. गुरूवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास याच मागणीसाठी तो घरी गेला. त्यांनी आम्ही आत्ताच लग्न समारंभावरुन घरी आलो आहोत. उद्या सकाळी पैसे देतो असे शेख यांनी सांगितले. त्यावरुन शाब्दिक वादावादी झाली. आरोपीने फिर्यादी, तिचा नवरा व मुलगा भैया यांना दगड, काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलिसांना मी भीत नाही. काय करायचे ते करा. पैसे वसूल केल्याशिवाय राहणार नाही अशी धमकी देऊन तो निघून गेला. या प्रकारानंतर सकाळी शेख कुटुंबीय पोलीस ठाण्यात आले. फिर्यादीला उपचारासाठी उपजिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरा आरोपीविरुध्द गुन्हा दाखल झाला. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक मधुकर शिंदे म्हणाले की, तपासानंतर आरोपी सावकारी व्यवसाय करत असल्याचे निष्पन्न झाले तर तसा गुन्हा दाखल करण्यात येईल.(वार्ताहर)