शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा-संघात धुसफूस

By admin | Updated: May 31, 2016 02:02 IST

राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणेच आता भारतीय जनता पक्षातही धुसफूस सुरू झाली आहे. भाजपाने शहर पदाधिकाऱ्यांची १४४ जणांची जंबो कार्यकारिणी जाहीर केली.

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणेच आता भारतीय जनता पक्षातही धुसफूस सुरू झाली आहे. भाजपाने शहर पदाधिकाऱ्यांची १४४ जणांची जंबो कार्यकारिणी जाहीर केली. पहिल्या यादीत डावलल्याने भाजपाविरुद्ध संघ असा संघर्ष सुरू होतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, बोभाटा होण्यापूर्वीच पक्षश्रेष्ठींनी हस्तक्षेप केल्याने वादावर पडदा पडला.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपाला यश मिळाल्याने पिंपरीतील भाजपाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टक्कर देणारा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या रूपाने सक्षम शहराध्यक्ष मिळाला आहे. त्यामुळे महापालिकेत ‘अब की बार...’ अशी चर्चा शहरात रंगली आहे. नाराजांना आपल्याकडे ओढण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी आणि काँगे्रसमधील विद्यमान नगरसेविकांचे पती, तसेच विद्यमान पदाधिकाऱ्यांना भाजपात घेतले आहे. भाजपाच्या शहराध्यक्षपदाचे खांदेपालट झाल्याने तब्बल चार महिन्यांनी मागील आठवड्यात शहराध्यक्षांनी शहर कार्यकारिणीचा विस्तार केला. खासदार अमर साबळे, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पटवर्धन, आमदार जगताप यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसोहब दानवे असे समर्थकांचे प्रमुख गट आहेत. ‘भाजपा हा आमचा एकमेव गट आहे’ असे वर वर भाजपातील स्थानिक नेते दाखवीत असले, तरी प्रत्येक जण अस्तित्व टिकविण्यासाठी धडपड करीत आहेत. भाजपाची शहराध्यक्षपदाची सूत्रे जगतापांकडे असली, तरी विविध गटांची मोट बांधण्याचे आव्हान शहराध्यक्षांसमोर आहे. (प्रतिनिधी)