शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्रक्रियेआधी इमानला घटवावे लागणार 100 किलो वजन

By admin | Updated: February 13, 2017 09:36 IST

वजन कमी करणारी शस्त्रक्रिया करुन घेण्यासाठी इजिप्तहून मुंबईत आलेली इमान अहमद आतुरतेने बेरिअ‍ॅट्रिक शस्त्रक्रियेची आतुरतेने वाट पाहत आहे.

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 13 - वजन कमी करणारी शस्त्रक्रिया करुन घेण्यासाठी इजिप्तहून मुंबईत आलेली इमान अहमद आतुरतेने बेरिअ‍ॅट्रिक शस्त्रक्रियेची आतुरतेने वाट पाहत आहे. 500 किलो वजनामुळे जगातील सर्वात लठ्ठ महिला ठरलेल्या इमानला या शस्त्रक्रियेनंतर सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगण्याची इच्छा आहे. 
 
पण ही शस्त्रक्रिया वाटते तितकी सोपी नाही. बेरिअ‍ॅट्रिक शस्त्रक्रियेआधी इमानला तिचे वजन 100 किलोने घटवावे लागणार आहे. डॉ. मुफाझल लकडावाला यांच्या देखरेखीखाली मागच्या दोन महिन्यात इमानने 30 किलो वजन कमी केले. चर्नीरोडच्या सैफी रुग्णालयात इमानवर शस्त्रक्रिया होणार असून, पुढचे 48 तास तिच्यासाठी महत्वाचे आहेत असे डॉ. लकडावाला यांनी सांगितले. 
 
आणखी वाचा 
इमानच्या शस्त्रक्रियेत भूलतज्ज्ञ बजावणार महत्त्वाची भूमिका
 
शस्त्रक्रियेआधी डॉक्टर इमानच्या वेगवेगळया चाचण्या करणार आहेत. लठ्ठपणासाठी 91 प्रकारचे जीन्स कारणीभूत असतात. ही जीन्सची चाचणी सर्वात महत्वाची असणार आहे. या चाचणीतून लठ्ठपणाला नेमका कुठला घटक कारणीभूत आहे ते समजेल. जन्माच्यावेळी इमानचे वजन 5 किलो होते. वयाच्या 11 व्या वर्षापासून तिचे वजन वाढण्यास सुरुवात झाली. 
 
विशेष वॉर्ड 
शस्त्रक्रियेसाठी सैफी रुग्णालयाकडून विशेष वॉर्ड बांधण्यात येत आहे. या वॉर्डमध्ये एक ऑपरेशन थिएटर, आयसीयू, डॉक्टरांसाठी खोली, दोन विश्रांतीगृह आणि तळमजल्यावर एक व्हिडीओ कॉन्फरन्सिंग रुम असणार आहे.इमान अहमद यांचं वजन लक्षात घेता त्याआधारे सर्व वस्तूंची उपलब्धता आणि जागेचं बांधकाम करण्यात आलं आहे. यामध्ये 7 फूट रुंद दरवाजे बांधण्यात आले असून, बेडदेखील 7 फूट रुंद असणार आहे.