शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

धरणग्रस्त वसाहतीत सुविधांची वानवा

By admin | Updated: July 4, 2016 01:36 IST

धरणासाठी आपल्या मूळ जागा देऊन दुसरीकडे स्थलांतरित झालेले गुंजवणी धरणग्रस्त वसाहतीतील असुविधांमुळे त्रस्त झाले आहेत.

मार्गासनी : धरणासाठी आपल्या मूळ जागा देऊन दुसरीकडे स्थलांतरित झालेले गुंजवणी धरणग्रस्त वसाहतीतील असुविधांमुळे त्रस्त झाले आहेत.गुंजवणी धरणाच्या उजव्या तीरावर घरे बांधताना नवीन संसार उभा करताना येणाऱ्या अडचणीमुळे अश्रूंचा बांध फुटत काही आपल्या व्यथा ‘लोकमत’कडे मांडल्या. पूर्णत: बुडीत कोदापूर गावातील धरणग्रस्तांच्या गुंजवणी धरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या वर्षी पाणीसाठ्यात वाढ होणार असल्याने कोदापूर गाव हे पाण्याखाली जाणार असल्याने धरणग्रस्तांना गाव सोडावे लागले. या गावातील धरणग्रस्तांना गुंजवणी धरणाच्या तीरावर गावठाण क्रमांक १ व २ बसविले आहेत. परंतु गावठाण क्रमांक १ मध्ये काहीच घरे पूर्ण होत असली तरी काहींनी निवारा शेडमध्येच राहणे पसंत केले आहे.या गावठाणासाठी जरी शासनाकडून काही सुविधा पुरविल्या गेल्या असल्या, तरी अनेक सुविधांपासून हे गावठाण वंचित राहिल्याची बाब पुढे येत आहे.या गावठाणातील अंतर्गत रस्ता मातीचा असल्याने पावसाने या ठिकाणी दळणवळण करणे अवघड झाले असून, बांधकामासाठी उपयुक्त असलेले साहित्य हे वसाहतीपासून दूर अंतरावर उतरवले जात असल्याने बांधकामास अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे या ठिकाणी पक्का रस्ता होण्याची मागणी होत आहे. या गावठाणात ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. येथील महिलांना दीड किलोमीटरवरून वेल्हे किंवा भट्टी वाघदरा या गावातून भर पावसात कसरत करून पाणी आणावे लागत आहे. मुलांना शाळा सोडून दोन किलोमीटर चालत वेल्हे या ठिकाणी शाळेत जावे लागते. शेतीही धरणात गेल्याने उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन त्यांच्याकडे नसल्याने अनेक संसार उघड्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोणताही रोजगार व उदरनिर्वाहासाठी साधन नसल्याने शासनाने रेशनिंग दिले पाहिजे, अशी मागणी धरणग्रस्तांनी या वेळी केली आहे. अन्यथा जलसंपदा विभागाची गुंजवणी धरणाजवळ असलेली ३५ ते ४० एकर जमीन पूर्ण पुनर्वसन होईपर्यंत धरणग्रस्तांना भाडेतत्त्वावर कसण्यास द्यावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)