शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन व्हिसाची १५० देशांसाठी सोय

By admin | Updated: August 28, 2016 00:45 IST

भारतीय परराष्ट्र विभागातर्फे जगातील १५० देशांना इलेक्ट्रॉनिक व्हिसाची (आॅनलाइन व्हिसा) सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामुळे भारतात अल्प काळासाठी येणाऱ्या नागरिकांना

पुणे : भारतीय परराष्ट्र विभागातर्फे जगातील १५० देशांना इलेक्ट्रॉनिक व्हिसाची (आॅनलाइन व्हिसा) सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामुळे भारतात अल्प काळासाठी येणाऱ्या नागरिकांना (पर्यटन व इतर) आता कोणताही निर्बंध नसल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयातील सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी शनिवारी दिली. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने मुळे यांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. मुळे म्हणाले, ‘‘मागील पाच वर्षात पासपोर्ट आणि व्हिसा पॉलिसीत आमूलाग्र बदल झाला आहे. इलेक्ट्रॉनिक व्हिसामुळे जगातील १५० देशांतील नागरिकांना घरबसल्या व्हिसा उपलब्ध होणार आहे. तर दुसरीकडे देशात मागील वर्र्षी पासपोर्टसाठी दोन कोटी नागरिकांचे अर्ज दाखल झाले होते. इतक्या मोठ्या प्रमाणात अर्ज येत असले तरी अद्यापही देशातील दहा टक्के नागरिकांकडेच पासपोर्ट आहे. देशामध्ये पासपोर्ट विभागाची १०० कार्यालये आहेत. या माध्यमातून ते जास्तीत जास्त एक ते दीड कोटी प्रकरणेच हाताळू शकतात. यामुळे देशात कमीत कमी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पासपोर्ट उपलब्ध झाला पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सौदी अरेबीयातील नोकरी गमावलेल्या भारतीयांना भारतात आणण्याचे काम दररोज करण्यात येत आहे. हे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु असून भारत सरकारने याबाबत जागतिक पातळीवर अतुलनीय कामगिरी केली आहे. या नागरिकांना परतीचे तिकीट मिळेपर्यंत तेथील सरकारने निवास व भोजनाची सोयही उपलब्ध केली आहे. कोणताही भारतीय नागरिक विदेशात विपण्ण अवस्थेत राहणार नाही याची काळजी भारत सरकारने घेतली असल्याचे मुळे यांनी स्पष्ट केले. राजकारण्यांना परदेश व्यापारनीतीचे ज्ञान आवश्यक असेल तरच दोन देशांच्या संबंधात सुधारणा होते. हे संबंध फक्त पंतप्रधान व परराष्ट्र मंत्र्यांपुरतेच मर्यादित नकोत. स्थानिक आमदार, महापौर यांच्यामध्येही तसेच संबंध राखले पाहिजे. हे राज्यकर्ते दुसऱ्या देशांचा प्रवास करत नाहीत तो पर्यंत ते जनतेला संबंधित देशाबद्दल चांगले सांगू शकत नाहीत. यामुळे भारतानेही या दृष्टीकोनातून वाटचाल करण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचे मुळे म्हणाले. पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे, पत्रकार संघाचे अध्यक्ष गजेंद्र बडे, सरचिटणीस अजय कांबळे यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)