शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जानकरांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद

By admin | Updated: October 13, 2016 06:05 IST

भगवानगड येथील दसरा मेळाव्यात पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर एकेरी भाषेत

पुणे/बीड/ ठाणे : भगवानगड येथील दसरा मेळाव्यात पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर एकेरी भाषेत केलेल्या टीकेचे अनेक ठिकाणी पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जानकरांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले, तर रासपच्या कार्यकर्त्यांनी बारामती होस्टेलमधील शरद पवार यांच्या छायाचित्रावर शाई फेकण्याचा प्रकार केला़. विजयादशीच्या दिवशी भगवान गडाच्या पायथ्याशी झालेल्या सभेमध्ये जानकर यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली होती. पंकजा मुंडे यांना असलेल्या विरोधाच्या मागे बारामतीचाच हात असल्याचा थेट आरोप त्यांनी केला होता. शिवाय, धनंजय मुंडे यांना चमचा म्हटले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जानकरांवर संतप्त झाले आहेत.बुधवारी ठाण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली मंत्री जानकर यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. लायकी नसलेल्या जानकरांची मंत्रिमंडळातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हकालपट्टी करावी, अशी मागणी आ. जितेंद्र आव्हाड यांनी केली.

पुण्यात शाईफेक-पशुसंवर्धनमंत्री जानकर यांच्या हिंगणे येथील कार्यालयाची मोडतोड केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बारामती होस्टेलमधील शरद पवार यांच्या छायाचित्रावर शाई फेकली़ ही घटना दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली़ चतु:श्रृंगी पोलिसांनी उमेश कोकरे यास ताब्यात घेतले आहे. ही घटना समजताच आमदार अनिल भोसले, माजी नगरसेवक नीलेश निकम, युसुफखान, उदय महाले यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी जनवाडी पोलीस चौकीसमोर गर्दी केली़ तेव्हा रासपचे कार्यकर्ते संतोष पाटील हे तेथे उभे राहून फोनाफोनी करीत होते़ त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व त्यांच्यात वादावादी झाली़ काही जणांनी त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला़ तेव्हा पोलिसांनी त्यांना बाजूला घेतले़ (लोकमत न्यूज नेटवर्क)