शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

जलसंपदाला निधी जादाच

By admin | Updated: February 6, 2016 03:39 IST

गेल्या दहा वर्षात पहिल्यांदाच जलसंपदा विभागाला अर्थसंकल्पीय तरतुदीहून जास्तीचा निधी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपलब्ध करून दिला असून आता हा निधी ३१ मार्चपर्यंत खर्च करण्याची जबाबदारी

अतुल कुलकर्णी,  मुंबईगेल्या दहा वर्षात पहिल्यांदाच जलसंपदा विभागाला अर्थसंकल्पीय तरतुदीहून जास्तीचा निधी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपलब्ध करून दिला असून आता हा निधी ३१ मार्चपर्यंत खर्च करण्याची जबाबदारी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यावर आली आहे.जलसंपदा विभागातील घोटाळ्यांच्या आरोपामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार गेले. मात्र मुनगंटीवार यांनी त्याच जलसंपदाचे सगळेच्या सगळे बजेट तीन महिने आधीच वितरीत करुन मंत्री महाजन यांचीही एक प्रकारे अडचण केली आहे. गेल्या ५० वर्षात जलसंपदा विभागाच्या बजेटला कायम कात्री लागली आहे. शिवाय, ३१ मार्चला पैसे मिळाले की कागदोपत्री खर्च झाल्याचे दाखवण्याची पध्दती रुढ झाली होती. राजकीय दृष्टीने सोयीच्या नसणाऱ्या प्रकल्पावर निधी खर्च होऊ द्यायचा नाही आणि तो ‘लॅप्स’ होईल अशी भीती घालून तो निधी दुसऱ्या प्रकल्पावर खर्च करायचा, पुढच्या बजेटमध्ये त्या प्रकल्पाला निधी देऊ असे सांगून बजेटची पळवापळवी करायची, हे प्रकार सातत्याने घडत होते. त्यातूनच विदर्भ, मराठवाड्याचा निधी पळवल्याचे आरोप व्हायचे. मात्र, वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी नामी शक्कल लावली. अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी जलसंपदा विभागाला ७२७२ कोटी मंजूर केले होते. त्याशिवाय गोसीखुर्दसाठी राज्याच्या हिश्श्यापोटीचे १०१.७० कोटी, असे एकूण ७३७३.७० कोटी रुपये जानेवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात जलसंपदा विभागाला देऊन टाकले आहेत. मराठवाडा, विदर्भ, उर्वरित महाराष्ट्र पाटबंधारे मंडळांकडे हा निधी जमा केला गेला आहे. त्यामुळे आता प्रकल्पांच्या निधीची पळवापळवी किंवा काम न होताच बिले उचलण्याचे प्रकार घडणार नाहीत.मात्र तीन महिने आधी मिळालेला निधी त्या त्या प्रकल्पांवरच खर्च होईल याची जबाबदारी जलसंपदा मंत्री ाहाजन यांच्यावर आली आहे. या विभागाचा पूर्वइतिहास आणि टक्केवारीच्या गाळात अडलेले प्रकल्प बाहेर काढण्याचा विडा उचललेल्या महाजन यांना मिळालेला निधी त्याच प्रकल्पावर वेळेच्या आत तीन महिन्यात खर्च करुन ते प्रकल्प पूर्ण करुन दाखवायचे आहेत.केंद्र शासन एआयबीपी (एक्सलरेटेड एरिगेशन बेनिफीट प्रोग्राम) नावाच्या योजनेअंतर्गत राज्यांना प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी देते. त्यात केंद्राचा आणि राज्याचा वाटा असतो. आजवर केंद्राचा निधी कधीही पूर्ण मिळाला नाही, मध्यंतरी काँग्रेसच्या काही नेत्यांनी दिल्लीत तक्रारी केल्यानंतर जो मिळत होता तोही निधी पुरेसा आला नाही. आता केंद्राने ती योजनाच बंद करण्याचे ठरवले असले तरी त्याअंतर्गत जे प्रकल्प सुरु आहेत त्यांना केंद्राचा हिस्सा येण्याची वाट न पहाता मुनगंटीवार यांनी यावर्षी राज्याचा पूर्ण हिस्साही देऊन टाकला आहे. त्यामुळे ते प्रकल्पही टक्केवारीतून मुक्त करत मार्गी लावण्याची जबाबदारी विभागावर आली आहे.