शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

बाहेरगावी जाताय, सावधान!

By admin | Updated: September 18, 2016 00:50 IST

शहरात व शहराच्या आसपासच्या गावांतील बंद घरांचे कुलूप तोडून चोऱ्यांच्या प्रमाणात अलीकडेच मोठ्या प्रमाणात वाढ झाली

भोर : शहरात व शहराच्या आसपासच्या गावांतील बंद घरांचे कुलूप तोडून चोऱ्यांच्या प्रमाणात अलीकडेच मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील आठ महिन्यांत ८ ते १० घरे फोडून चोऱ्या झाल्या आहेत, तर ५ दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत, स्टँडवर व इतरत्र अशा १० चोऱ्या असे एकूण १८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.अनेक जण गुन्हे दाखल करीतच नाहीत. यामुळे आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाहेरगावी जाताय, सावधान! घराला कुलूप हमखास चोरी होणार. चोऱ्यांमुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून रात्री-अपरात्री घराबाहेर पडता येत नाही. भोर पोलिसांच्या कामकाजाबद्दल नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.मागील महिनाभरात शहरातील शेवटची गल्ली भेलकेवाडीत गणपती सणाला गावाला गेलेल्या बंद घरांच्या दरवाजाची कडी तोडून घरातील किमती वस्तू, रोख रक्कम, दागिने चोरट्यांनी चोरून नेले. तर, उत्रौली येथील चार बंद घरांची कुलपे तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून जबरी चोऱ्या केल्या आहेत. एसटी स्टाँडवर व बाजारात गर्दीचा फायदा घेत मोबाईल, पाकीट,मंगळसूत्र व इतर सोन्याच्या वस्तूंच्या चोऱ्या होतात. आठवड्यापूर्वी पिराचामळा, भोरेश्वरनगर येथे रात्री साडेदहा वाजता चोरटे चोरी करण्याच्या उद्देशाने आले होते. मात्र, नागरिक जागे असल्याने चोरटे पसार झाले. ग्रामीण भागातही अशाच पद्धतीने चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. महिनाभरात ८ ते १० घरांत चोऱ्या झाल्या आहेत. यामुळे नागरिक रात्री-अपरात्री घराबाहेर पडत नसून लोकांमध्ये घबराट पसरली आहे. भोर पोलिसांत दरवेळी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला जातो आणी तपास सुरू असल्याचा फार्स केला जातो. मात्र, प्रत्यक्षात हातात काहीच लागत नाही. अशा गुन्ह्यातील एकही आरोपी सापडला नसून कशाचाही तपास लागलेला नाही. यामुळे भोर पोलीस निरीक्षकांच्या कामकाजाबद्दल शंका व्यक्त केली जात असून सर्वसामान्य नागरिक नाराजी व्यक्त क रीत आहेत.भोर पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या दुचाकी चोरीच्या ५ गाड्या चोरीपैकी ३ गाड्या परत मिळाल्या आहेत. तर, तीन घरफोड्या करणाऱ्यांना पोलिसांनी अटक करून गुन्हा कबुल केल्याचे भोर पोलिसांकडून सांगण्यात आले.(वार्ताहर)>बंद घरांची टेहाळणी : चोरांचा प्रवेशभोर शहरातील अनेक आळीतील बंद घरांची दिवसा टेहळणी करून, रात्रीच्या वेळी आजूबाजूच्या घरांच्या दरवाजाच्या बाहेरून कड्या लावून कोणीही मदतीला येणार नाही, याची खबरदारी घेऊन कटावणीने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करतात. घरातील सोने-नाणे, किमती वस्तू पैसे चोरटे चोरूक्षन नेत आहेत.