शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
5
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
6
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
7
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
8
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
9
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
10
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
11
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
12
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
13
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
14
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
15
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
16
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
17
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
18
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
19
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
20
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
Daily Top 2Weekly Top 5

मतदार नोंदणीसाठी २१ आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ

By admin | Updated: October 17, 2016 04:30 IST

राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या मोहिमेला निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली

मुंबई : राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या मोहिमेला निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली असून, आता २१ आॅक्टोबरपर्यंत नागरिकांना आपल्या नावाचा समावेश, नाव वगळणे अथवा दुरुस्तीसाठी अर्ज करता येणार आहे. आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीसाठी हीच यादी ग्राह्य धरली जाणार असल्याने या निवडणुकीत मतदान करू इच्छिणाऱ्या नवमतदारांसाठी नाव नोंदणीसाठी ही अंतिम संधी असणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १४ आॅक्टोबरपर्यंत राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांच्या छायाचित्र मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. या मोहिमेला एक आठवड्याची मुदतवाढ देण्यात आली असून, आता २१ आॅक्टोबरपर्यंत नाव नोंदणी, दुरुस्ती अथवा स्थलांतरासाठी मतदारांना अर्ज करता येणार आहे. १६ सप्टेंबर २०१६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत ज्या पात्र मतदारांची नावे समाविष्ट केली नसतील अथवा यादीतील नोंदीत सुधारणा, दुरुस्ती करायच्या असतील अशा मतदारांनी २१ आॅक्टोबरपर्यंत आपल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात तसेच अतिरिक्त मदत केंद्रांवर अर्ज सादर करावेत, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे. लोकप्रतिनिधी अधिनियम, १९५०च्या तरतुदीनुसार पूर्वीच्या मतदार यादीतील मयत, स्थलांतरित तसेच दुबार नाव नोंदणी असलेल्या मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. वगळण्यात आलेल्या नावांची अतिरिक्त यादी या मतदार नोंदणी कार्यालयात ठेवण्यात आली आहेत. तरी नागरिकांनी या वाढीव मुदतीचा लाभ घेण्याचे आवाहन आयोगाने केले आहे. (प्रतिनिधी)