शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

नितीन गडकरी- फडणवीस यांची ‘विस्तारित’ चर्चा

By admin | Updated: November 30, 2015 03:16 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी रात्री वाड्यावर जात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी तब्बल दीड तास चर्चा केली. या चर्चेत मंत्रिमंडळ विस्तारावर विचारमंथन झाले

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी रात्री वाड्यावर जात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी तब्बल दीड तास चर्चा केली. या चर्चेत मंत्रिमंडळ विस्तारावर विचारमंथन झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ विस्तारात मित्रपक्षांना सामावून घेत महत्त्वाची खाती द्यायची, मराठवाडा व मुंबईला झुकते माप द्यायचे व सोबत विदर्भालाच खूपकाही दिले जात आहे, असा संदेश जाणार नाही याची काळजी घ्यायची या मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भातील आहेत. याशिवाय ऊर्जा व वित्त, वन यासारखी महत्त्वाची खातीही विदर्भाला मिळाली आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात विदर्भाला पुन्हा झुकते माप न देता एखाद-दुसऱ्या आमदाराला संधी देऊन इतरांना मंडळ, महामंडळांवर सामावून घेता येईल, यावर गडकरी-फडणवीस यांच्यात एकमत झाल्याचे समजते. शिवाय, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतून कोणाला मंत्रिमंडळात स्थान द्यायचे यावर चर्चा झाली. या चर्चेत भाजपाचे मुंबई शहर अध्यक्ष आ. आशिष शेलार यांचे नाव होते. मित्रपक्षांना डावलले जात आहे. त्यांची फरफट होत आहे, असे आरोप राजकीय वर्तुळात केले जात आहेत. त्यामुळे मित्रपक्षांतून राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत तसेच खा. रामदास आठवले यांच्या गटातून एकाला संधी देण्यावर उभयतांमध्ये एकमत झाल्याचे समजते. (प्रतिनिधी)