शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

गणिताला पर्याय देण्यास तज्ज्ञांचा नकार

By admin | Updated: June 26, 2017 16:10 IST

इयत्ता दहावीमध्ये गणित विषय ऐच्छिक करून त्याला पर्याय देण्याबाबत काही तज्ज्ञांनी नकार दर्शविला आहे. गणित हा इतर सर्वच विषयांसाठी

अविनाश थोरात/ऑनलाइन लोकमतपुणे, दि. २६ - इयत्ता दहावीमध्ये गणित विषय ऐच्छिक करून त्याला पर्याय देण्याबाबत काही तज्ज्ञांनी नकार दर्शविला आहे. गणित हा इतर सर्वच विषयांसाठी आवश्यक असणारा घटक आहे. गणित विषय अवघड वाटण्यामागे अध्यापनातील त्रुटी ही महत्वाची समस्या आहे. त्यामुळे गणिताला पर्याय देण्यापेक्षा अध्यापन पध्दतीत सुधारणा करून गणिताची गोडी वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. अनेक विद्यार्थ्यांना गणित विषय अवघड वाटतो. त्यामुळे हे विद्यार्थी या विषयात दहावीत अनुत्तीर्ण होतात. ही गळती रोखण्यासाठी दहावीमध्ये गणित हा विषय ऐच्छिक ठेवण्याबाबत उच्च न्यायालयाने विचारणा केली आहे. त्यावरून शिक्षण क्षेत्रात तर्कवितर्क लढविले जात आहेत. गणिताला पर्याय म्हणून काही वर्षांपासून सामान्य गणित हा विषय सुरू करण्यात आला होता. पण हा विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुढे तंत्रशिक्षणमध्ये प्रवेश मिळत नव्हता. तसेच विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी होत गेल्याने आणि काही शाळांकडून विद्यार्थ्यांना हा विषय घेण्यासाठी जबरदस्ती होत असल्याने राज्य शिक्षण मंडळाने येत्या शैक्षणिक वर्षापासून हा पर्याय बंद करण्याचा निर्णय घेतला. आता पुन्हा गणिताला पर्याय देण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. याबाबत काही तज्ज्ञांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना गणिताला पर्याय न देण्याची भुमिका मांडली. गणिताला पर्याय देण्यापेक्षा या विषयाची आवक निर्माण होण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, मागील सात वर्षांची गणित विषयातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी पाहिल्यास ती सामान्य गणितापेक्षा अधिक दिसते. गणित विषयाचा निकालही वाढत जावून मागील चार वर्ष ८८ ते ९० टक्क्यांमध्ये स्थिर राहिला आहे. तुलनेने सामान्य गणिताचा निकाल आणि विद्यार्थी संख्याही सातत्याने घटत चालल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.  शिक्षणमंत्री सकारात्मक?शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काही महिन्यांपुर्वी पुण्यात एका कार्यक्रमात इंग्रजी व गणित या दोन्ही विषयांना पर्याय देण्याबाबत आपण सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले होते. दोन्ही विषयांत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने या विषयांची त्यांना भीती वाटते. अनुत्तीर्ण झाल्याने अनेकांचे शिक्षण थांबते. त्यामुळे या विषयांना पर्याय देण्याबाबत तज्ज्ञ अभ्यास करतील, असे तावडे यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या सुचनेवर तावडे यांची भुमिका महत्वाची ठरणार आहे. गणित विषय ऐच्छिक करून त्याला पर्याय देण्याचे तोटेच अधिक आहेत. किमान गणित आयुष्यभर पुरणारे असते. केवळ विज्ञानच नव्हे तर समाजशास्त्र, मानसशास्त्र, भुगोल अशा सर्वच विषयांमध्ये गणित आवश्यक असते. दहावीच्या परीक्षेत गणित विषयाचा निकाल ८८ टक्के असून तो खुप चांगला आहे. केवळ १२ टक्के विद्यार्थी अनुतीर्ण झाले आहेत. त्यामुळे गणित विषयात अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असल्याचा दावा चुकीचा आहे. गणिताला पर्याय दिल्यास निकाल चांगला लागण्यासाठी काही शाळा विद्यार्थ्यांना पर्यायी विषयासाठी जबरदस्ती करतील. याचा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिक बसेल. पर्याय देण्यापेक्षा विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.- वसंत काळपांडे, माजी अध्यक्षमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ गणित विषय दहावीपर्यंत अनिवार्य असायलाच हवा. गणित ऐच्छिक ठेवणे चुकीचे ठरेल. गणित विषय अवघड वाटण्यामागे विविध कारणे आहेत. अध्यापनामध्ये वैविध्य आणून शिक्षण दिल्यास गणिताबाबत विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण होईल. पुर्वी याकडे दुर्लक्ष केले जात होते. आता अनेक अध्यापनाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. -संगिता मोहिते, प्राचार्या गणित विषयातील संकल्पना स्पष्ट झाल्यास हा विषय अवघड वाटत नाही. इयत्ता आठवीपर्यंत गणिताचे पायाभुत शिक्षण चांगल्यापध्दतीने मिळणे गरजेचे आहे. हा पाया असून तो पक्का नसल्यास पुढे नववी व दहावीत विद्यार्थी अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढते. विद्यार्थ्यांची किमान संपादणुक पातळी वाढविण्याचे काम शिक्षकांनी करायला हवे. प्रत्येक विषयामध्ये गणित विषय आवश्यक असतो. गती नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी गणित विषय ऐच्छिक ठेवल्यास त्यांना फायदाच होईल. पण शिक्षकांनी गणित विषय शिकविताना अध्यापनात नाविण्य आणल्यास विद्यार्थ्यांची गोडी वाढून फारसा अवघड वाटणार नाही.- कैलास साळुंके, अध्यक्षपुणे जिल्हा गणित अध्यापक मंडळ