शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

व्यायाम प्रशिक्षकाचा पत्नीवर हल्ला

By admin | Updated: October 19, 2016 02:11 IST

व्यायामशाळा प्रशिक्षकाने धारदार शस्त्राने पत्नीवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रकार गोरेगावात शनिवारी सकाळी घडला.

मुंबई : व्यायामशाळा प्रशिक्षकाने धारदार शस्त्राने पत्नीवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रकार गोरेगावात शनिवारी सकाळी घडला. या प्रकरणी बांगुरनगर पोलिसांनी पतीला अटक केली आहे. स्थानिक न्यायालयाने त्याला १९ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सूरज यशवंत राव (३८) असे अटक करण्यात आलेल्या व्यायामशाळा प्रशिक्षकाचे नाव आहे. त्याची पत्नी मानसी (३६) हीदेखील व्यवसायाने व्यायामशाळा प्रशिक्षक आहे. मात्र, या दोघांचे एकमेकांशी पटत नसल्याने, मानसी ही त्यांची आठ वर्षांची मुलगी आणि दीड वर्षाच्या मुलासह, चिंचोली बंदर परिसरात असलेल्या क्वीन सेंट इमारतीत भाडेतत्त्वावर राहते, तर सूरज बोरीवली पूर्व येथे त्याच्या पालकांसोबत राहतो. शनिवारी सकाळी ११च्या सुमारास सूरज हा क्वीन सेंट इमारतीत आला, तेव्हा मानसी त्याला लिफ्टच्या दरवाज्याजवळ दिसली. त्या वेळी त्या दोघांमध्ये वाद सुरू झाला; त्यादरम्यान सोबत आणलेल्या चाकूने सूरजने तिच्यावर दोन वार केले. तेव्हा मानसीने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर, इमारतीचे सुरक्षारक्षक राम गुप्ता (५०) तेथे पोहोचले. मानसीच्या पोटात चाकू मारून पळण्याचा तयारीत असलेल्या सूरजला त्यांनी अडविण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने गुप्ता यांच्याही पोटात चाकू भोसकला. तितक्यात, इमारतीचे इतर सुरक्षारक्षक त्यांच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी गुप्ता व मानसीला सूरजच्या तावडीतून सोडवून, त्याला बांगुरनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. या दोन्ही जखमींना गोरेगावच्या कपाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. कांदिवलीच्या एका व्यायामशाळेत एकत्र काम करणाऱ्या सूरज आणि मानसीचे एकमेकांवर प्रेम होते. त्यानंतर, २००६ साली त्यांनी लग्न केले आणि दोघेही वेगवेगळ्या व्यायामशाळेत काम करू लागले. त्यांना दोन मुलेदेखील झाली. मात्र त्यानंतर, सूरज हा मानसीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला आणि त्यावरून त्यांच्यात खटके उडू लागले. त्यामुळे हे दोघे वेगळे राहू लागले. मानसीने सूरजला मुलांना भेटण्यासही विरोध केला, ज्यामुळे सूरजने सात महिन्यांपूर्वी कोर्टात धाव घेतली. मात्र, प्रत्येक सुनावणीवेळी मानसी गैरहजर राहायची. हे पाहून सूरजच्या डोक्यात तिडीक गेल्याने, त्याने हा सगळा प्रकार केला. (प्रतिनिधी)