शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

व्यायाम करा अन् आनंदी रहा

By admin | Updated: May 23, 2015 00:39 IST

दिवसभर कामाच्या ठिकाणी ताजेतवाने राहायचे असेल तर रोज व्यायाम करा. मी दररोज चालते, सायकलिंग करते, जिमला जाते, असे विविध व्यायाम करते.

पुणे : दिवसभर कामाच्या ठिकाणी ताजेतवाने राहायचे असेल तर रोज व्यायाम करा. मी दररोज चालते, सायकलिंग करते, जिमला जाते, असे विविध व्यायाम करते. त्याचबरोबर नेहमी आनंदी राहते. त्यामुळे कितीही तास मी शूटिंगच्या कामात व्यस्त असले तरी मी ताजीतवानी राहते. तुम्हीही दररोज व्यायाम करा आणि आनंदी राहा, असा सल्ला प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने ‘लोकमत सखी मंच’च्या सखींना दिला. ‘लोकमत सखी मंच’ आणि ‘चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्यूट’ यांच्या वतीने ‘सुदृढ आरोग्य’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ‘अगंबाई अरेच्चा २’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनाली कुलकर्णी उपस्थित होती. या वेळी तिने उपस्थित महिलांशी मुक्त संवाद साधला. या प्रसंगी चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. जी. उन्नीकृष्णन, चिफ मेडिकल डायरेक्टर एम. के. मंडल, नगरसेविका पुष्पा कनोजिया, उद्योजक दिलीप वेडे-पाटील आदी उपस्थित होते.सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘मला फिट राहायला आवडते. त्यासाठी मी खूप प्रयत्न करते. बाळंतपणाच्या काळात मी माझा पूर्ण वेळ माझ्या बाळाला दिला. तेव्हा मात्र फिटनेसकडे लक्ष दिले नाही. बाळंतपणाचा आनंद घेतला. तो काळ मी जगले. त्यागावर माझा विश्वास नाही.’’ ‘अगंबाई अरेच्चा २’ या चित्रपटाबाबत सोनाली म्हणाली, ‘‘हा चित्रपट स्पर्शावर आधारित आहे. प्रत्येकाच्या जीवनात स्पर्शाला महत्त्व असते. वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरांचा स्पर्श हा खूप पवित्र असतो. आमच्या क्षेत्रात लुक्सला महत्त्व असते. त्यामुळेच मी फिटनेसला अधिक महत्त्व देते. या चित्रपटात मी साकारलेली भूमिका खूप वेगळी आहे. या चित्रपटाची कथा सुंदर आहे.’’मधुमेहतज्ज्ञ डॉ. अंजली भट आणि डॉ. वेदवती पुरंदरे यांनी मधुमेहाबद्दल माहिती दिली. मधुमेह टाळण्यासाठी कसा आहार घ्यावा, याबाबत त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)