शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

पेपर तपासणीवर बहिष्कार

By admin | Updated: March 2, 2015 02:19 IST

मूल्यांकनानुसार अनुदानास पात्र विनाअनुदानित शाळांची त्रयस्थ समितीमार्फत झालेली फेरतपासणी रद्द करण्याचे आश्वासन शालेय

मुंबई : मूल्यांकनानुसार अनुदानास पात्र विनाअनुदानित शाळांची त्रयस्थ समितीमार्फत झालेली फेरतपासणी रद्द करण्याचे आश्वासन शालेय शिक्षणमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले होते. याबाबत शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास दहावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा समितीने शिक्षणमंत्र्यांना पत्राद्वारे दिला आहे.विनाअनुदानित शाळांची शिक्षण विभागाने यापूर्वी अनेक समित्यांमार्फत तपासणी करून शाळांना अनुदानास पात्र ठरविले. यानंतर त्रयस्थ समितीकडून शाळांची तपासणी केली असून, ती चुकीच्या पद्धतीने झाली आहे. त्यामुळे अनुदानास पात्र अनेक शाळा चुकीची कारणे दाखवून अपात्र ठरवल्या आहेत. यासाठी कृती समितीने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन त्रयस्थ समिती रद्द करून पात्र झालेल्या शाळांना अनुदान देण्याची मागणी केली होती. शिक्षण विभागाकडून वेळकाढूपणाचे धोरण राबवत असल्याने शाळा कृती समितीने शिक्षणमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. याबाबत दोन दिवसांत निर्णय न घेतल्यास ९ मार्चपासून आझाद मैदानात आंदोलनाचा आणि त्यानंतर दहावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीने दिला आहे. दरम्यान, समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक ३ मार्च रोजी होणार असून, यात आंदोलनाबाबत निर्णय होणार आहे. या आंदोलनामुळे दहावीच्या परीक्षांवर परिणाम होणार नसून, विद्यार्थ्यांनी चिंता न करता परीक्षा द्यावी. परीक्षेनंतर शासनाने मागण्या मान्य केल्यास दिवस-रात्र पेपर तपासू, असे मुंबई जिल्हा महाराष्ट्र राज्य विनाअनुदान शाळा समितीचे अध्यक्ष प्रशांत रेडीज यांनी सांगितले. (प्रतिनिधी)