शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

शाळांमध्ये उत्साह, पण अडचणींचे काय?

By admin | Updated: September 2, 2014 01:06 IST

शिक्षकदिनाच्या औचित्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण विद्यार्थ्यांना दाखविण्यात यावे असे निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. उपराजधानीतील अनेक शाळांमध्ये

पंतप्रधानांचा थेट संदेश : शिक्षक संघटनांकडून संमिश्र प्रतिक्रियानागपूर : शिक्षकदिनाच्या औचित्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण विद्यार्थ्यांना दाखविण्यात यावे असे निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. उपराजधानीतील अनेक शाळांमध्ये यासंदर्भात उत्साह असला तरी काही शाळांसमोर या थेट प्रक्षेपणाची व्यवस्था कशी करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. उपराजधानीतील निरनिराळ्या शिक्षक संघटनांकडूनदेखील यासंदर्भात संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत.सुमारे शंभर दिवसांपूर्वी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षकदिनाचे औचित्य साधून ५ सप्टेंबर रोजी शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे पावणेदोन तास ते देशभरातल्या सर्वच शाळकरी विद्यार्थ्यांशी संपर्क साधणार आहेत. पंतप्रधानांचा संदेश विद्यार्थ्यांना पाहता यावा यासाठी सर्व शाळांनी विद्यार्थ्यांना दुपारी अडीच ते पावणे पाच या वेळेत एकत्रित जमवून कार्यक्रम पाहण्याची व्यवस्था करावी असे निर्देश शिक्षण उपसंचालकांकडून शाळांना देण्यात आले आहेत.या कार्यक्रमास इयत्ता पहिली ते दहावीचे सर्व विद्यार्थी, शिक्षक यांना उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या शाळेत टी.व्ही. नाही, अशा शाळांमध्ये मुख्याध्यापक किंवा संबंधित शाळेच्या व्यवस्थापन समितीने टी.व्ही. उपलब्ध करून द्यावा, विद्युतपुरवठा खंडित झाला असेल तर जनरेटरची व्यवस्था करावी, शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्यांला हे भाषण ऐकता यावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.ज्या शाळांमध्ये टीव्ही, संगणक यांची व्यवस्था आहे तेथे या संदेशाबाबत उत्साह दिसून येत आहे. परंतु अनेक विनाअनुदानित शाळांमध्ये टीव्ही संच, संगणक यांची व्यवस्था नाही. (प्रतिनिधी)